डेम्पो, चर्चिल ब्रदर्स, मोहन बागान आणि ईस्ट बंगाल या बलाढय़ क्लबसह देशातील १४ क्लब अखिल भारतीय फुटबॉल महासंघातर्फे (एआयएफएफ) घेण्यात आलेल्या क्लब परवाना चाचणीत अपात्र ठरले आहेत.
सर्व क्लब्सनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून त्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय एआयएफएफच्या क्लब परवाना समितीने घेतला. त्यात पुणे फुटबॉल क्लब, साळगावकर फुटबॉल क्लब, स्पोर्टिग क्लब डे गोवा, प्रयाग युनायटेड स्पोर्टिग क्लब, युनायटेड सिक्कीम, मोहमेडन स्पोर्टिग, मुंबई फुटबॉल क्लब, रंगदाजिएड फुटबॉल क्लब, शिलाँग लजाँग फुटबॉल क्लब आणि पैलान अ‍ॅरोज या क्लबचा समावेश आहे. मात्र या मोसमातील आय-लीग आणि फेडरेशन चषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एआयएफएफने सर्व क्लब्सना पुन्हा संधी देण्याचे ठरवले आहे.

Story img Loader