वृत्तसंस्था, पालेकेले

तंदुरुस्तीच्या कारणास्तव गेले चार महिने मैदानाबाहेर असलेला यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुल आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव यांना आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघात स्थान मिळाले आहे.

ex cm prithviraj chavan refuse to accept congress state president post
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच कायम;पृथ्वीराज चव्हाणांचा नकार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Gautam Gambhir Wants Yashasvi Jaiswal As Next India Captain After Rohit Sharma at loggerheads with Ajit Agarkar
India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण? (फोटो सौजन्य @Dev_Fadnavis)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?
Sharad Pawar on RSS Cadre
Sharad Pawar on RSS: शरद पवारांकडून RSS ची स्तुती; संघासारखे केडर निर्माण करण्याची गरज का व्यक्त केली?
ncp leader ajit pawar launch connect with people initiative
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा जनता संवाद उपक्रम; आठवड्यातील तीन दिवस मंत्री पक्षाच्या मुख्यालयात
BJP maharashtra Working president Ravindra Chavan
Ravindra Chavan: रवींद्र चव्हाण यांची अखेर भाजपाच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी वर्णी; राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांची घोषणा

५ ऑक्टोबरपासून भारतात खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी यजमानांच्या १५ सदस्यीय संघाची मंगळवारी घोषणा करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या १७ पैकी १५ खेळाडूंचे संघातील स्थान कायम राहिले आहे. डावखुरा फलंदाज तिलक वर्मा आणि वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा या दोन खेळाडूंना डावलण्यात आले आहे. या संघात चार अष्टपैलू असून संतुलित संघनिवड करण्याचा आमचा प्रयत्न होता, असे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर म्हणाले.

हेही वाचा >>>अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : महिला गटात नामांकितांना धक्के

३१ वर्षीय राहुलच्या तंदुरुस्तीबाबत बरीच चर्चा केली जात आहे. गेल्या ‘आयपीएल’दरम्यान क्षेत्ररक्षण करताना राहुलच्या मांडीला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्याने राहुलवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तंदुरुस्ती प्राप्त करण्यासाठी राहुलने बंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) बरीच मेहनत घेतली. या दुखापतीतून सावरण्याच्या मार्गावर असतानाच त्याला वेगळी दुखापत झाली. असे असतानाही सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने राहुलला मायदेशी थांबावे लागले आणि तो आशिया चषकातील दोन साखळी सामन्यांना मुकला. दरम्यानच्या काळात ‘एनसीए’मध्ये ५० षटके यष्टिरक्षण आणि ३५ हून अधिक षटके फलंदाजी करत राहुलने आपली तंदुरुस्ती सिद्ध केल्याची माहिती आगरकर यांच्याकडून देण्यात आली. त्यामुळे त्याची विश्वचषकासाठी संघात निवड केल्याचे आगरकर म्हणाले. तो आशिया चषकाच्या ‘सुपर फोर’ फेरीसाठीही उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

यष्टिरक्षक -फलंदाज म्हणून राहुल आणि इशान किशन यांना भारतीय संघात स्थान मिळाले असून संजू सॅमसनकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आले आहे. सॅमसन आशिया चषकासाठी राखीव खेळाडू आहे. राहुलच्या अनुपस्थितीत किशनने आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना झुंजार खेळी केली होती. त्यामुळे गरज पडल्यास किशन आणि राहुल या दोघांनाही अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्याची तयारी असल्याचे भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. यासह चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर प्रमुख दावेदार आहे.

हेही वाचा >>>चीन खुली बॅडमिंटन स्पर्धा : प्रणॉय, लक्ष्य पहिल्याच फेरीत पराभूत

मुंबईकर सूर्यकुमारवरही विश्वास दाखवण्यात आला आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र स्वत:ला सिद्ध करता आलेले नाही. परंतु, फटकेबाजी करून सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता लक्षात घेता सूर्यकुमारला संधी देण्यात आली आहे. मात्र, सर्व फलंदाज तंदुरुस्त असल्यास त्याला अंतिम ११मध्ये स्थान मिळवणे अवघड जाऊ शकेल. सूर्यकुमारचा मुंबई इंडियन्स संघातील सहकारी तिलकला मात्र १५ सदस्यीय संघात निवडण्यात आले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिलकला एकदिवसीय क्रिकेटचा अनुभव नसल्याने सूर्यकुमारला पसंती मिळाल्याची शक्यता आहे.

विश्वचषकात भारताच्या वेगवान गोलंदाजीची भिस्त जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या त्रिकुटावर असेल. बुमराने जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. गेल्या महिन्यात तो आर्यलडविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिकेत खेळला. आशिया चषकासाठीही बुमराला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. मात्र, पाकिस्तानविरुद्ध पावसामुळे बुमराला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यानंतर वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतल्याने तो नेपाळविरुद्ध खेळला नाही. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने अद्याप आपली तंदुरुस्ती सिद्ध केलेली नाही. अष्टपैलू हार्दिक पंडय़ा आणि शार्दूल ठाकूर हे अतिरिक्त वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावतील. हार्दिक उपकर्णधारपदही सांभाळेल.

ऑफ आणि लेग-स्पिनर नाहीच!

आशिया चषकाप्रमाणेच एकदिवसीय विश्वचषकासाठी डावखुरे फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यासह चायनामन कुलदीप यादवला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि लेग-स्पिनर यजुवेंद्र चहल यांना मात्र पुन्हा डावलण्यात आले आहे. आशिया चषकाचा संघ जाहीर करताना ‘आम्ही विश्वचषकासाठी अश्विन, चहल आणि अगदी वॉशिंग्टन सुंदर यांचाही विचार करू’ असे रोहित आणि आगरकर म्हणाले होते. मात्र, विश्वचषकासाठीही जडेजा आणि अक्षर या साधारण सारखीच गोलंदाजीची शैली असलेल्या फिरकीपटूंची निवड करण्यात आली आहे. हे दोघे एकत्रित खेळण्याची शक्यता फार कमी आहे. अशात प्रतिस्पर्धी संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या अधिक असेल आणि कुलदीप लयीत नसल्यास भारतीय संघ अडचणीत सापडू शकेल.

हेही वाचा >>>संतुलित संघनिवड -रोहित शर्मा

संघबदलासाठी २७ सप्टेंबपर्यंतचा वेळ

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारताने आपला प्राथमिक संघ जाहीर केला असला, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमांनुसार संघात बदल करायचा झाल्यास २७ सप्टेंबपर्यंतचा कालावधी असेल.

फलंदाज : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव

यष्टिरक्षक : इशान किशन, केएल राहुल

अष्टपैलू : हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर

गोलंदाज : मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव</p>

Story img Loader