ICC T20 World Cup: आयसीसी टी २० विश्वासचषकाला अवघे चार दिवस शिल्लक आहेत. अशावेळी जसप्रीत बुमराच्या जागी कोणत्या खेळाडूला जागा मिळणार याविषयी क्रिकेटप्रेमींना कुतुहूल आहे. बीसीसीआयकडून पर्यायी खेळाडूच्या नावावर शिक्कामोर्तब झाला नसला तरी तर्कवितर्कांच्या यादीत मोहम्मद शमीचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान जसप्रीत पाठोपाठ आता पाठीच्या दुखापतीमुळे दीपक चहरही संघातून बाहेर पडला आहे. चहरच्या जागी सध्या शमी, सिराज किंवा शार्दूल ठाकूर यांचे पर्याय विचारात घेतले जाऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडियाच्या निवडसमितीद्वारे खेळाडूंचे पर्याय चर्चेत असताना उमरान मलिक याच्याही नावाचा पर्याय समोर आला होता. मात्र त्याला कमी अनुभव असल्याचे म्हणत समितीतर्फे पर्याय फेटाळून लावण्यात आला होता. असं असलं तरी उमरान मलिक याला सरावासाठी संघासह ऑस्ट्रेलियात उपस्थित राहण्यास सांगितले होते. व्हिसासाठी अडचणी आल्याने मलिक अद्यापही ऑस्ट्रेलियाला पोहोचलेला नाही. उमरान मलिक हा जूनमध्ये आयर्लंड येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा भाग होता.

Big News! विश्वचषकाच्या आधी टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमरा पाठोपाठ ‘हा’ गोलंदाजही माघारी

उमरान मलिक याची निवड न झाल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने मलिकची पाठराखण करत भारतीय संघाला खडेबोल सुनावले आहेत. २२ वर्षीय उमरान मलिक हा १५० किमी प्रति तास या वेगाने गोलंदाजी करतो. जेव्हा भारताकडे जगातील सर्वात वेगवान गाडी आहे तर तिला गॅरेजमध्ये ठेवण्याला काय अर्थ आहे? असा प्रश्न करत ब्रेट ली यांनी भाष्य केले आहे.

ब्रेट ली म्हणतात, “उमरान अजूनही तरुण आहे, कमी अनुभवी आहे पण त्याला ऑस्ट्रेलियाला टीमने न्यायला हवे. मलिकसारखे खेळाडू जेव्हा संघात असतील तेव्हा तेच तुमच्या संघाची खास ओळख ठरू शकतात”. दरम्यान, टी 20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा पहिला सामना खेळला जाणार आहे, आशिया चषकातील पराभवाचा बदला घेण्याची ही संधी टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 150 kmph bowling speed but team india ignored indian bowler umran malik australia slams india ahead of world cup svs
Show comments