क्रिकेटमध्ये अनेक विक्रम घडत असतात, तर काही जुने विक्रम मोडलेही जातात. विक्रम करणारा खेळाडूही सर्वांच्या ओळखीचा होऊन जातो. असाच एक विक्रम काऊंटी क्रिकेटमध्ये घडला आहे. एका १६ वर्षाच्या क्रिकेटपटूने काऊंटी क्रिकेटच्या १३१ वर्षांच्या इतिहासात नव्या पराक्रमाची नोंद केली. डॅनियल इब्राहिम असे या क्रिकेटपटूचे असून इंग्लंडला आता नवा सचिन मिळाला आहे. भारताचा सर्वोत्तम आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही वयाच्या १६व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण करत सर्वांचे लक्ष वेधले होते.

१६ वर्ष आणि २९९ दिवस असे वय असलेल्या डॅनियलने ससेक्स संघाकडून काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पणात अर्धशतक ठोकले. अशी कामगिरी करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. इतकेच नव्हे तर त्याने गोलंदाजीतही आपली चुणूक दाखवत एका फलंदाजाला माघारी धाडले. यॉर्कशायरविरुद्ध डॅनियलने ५५ धावांची खेळी केली आणि गोलंदाजीत टॉम कॅडमोरला माघारी धाडले.

हेही वाचा – आधी बॅट आता स्कूटर..! मोहम्मद अझरुद्दीन देतोय जुन्या आठवणींना उजाळा

 

या खेळीनंतर डॅनियल म्हणाला, ”मी खेळत असल्याचे सांगण्यात आले, तेव्हा मला आश्चर्य वाटले, परंतु मीसुद्धा खूप उत्साही होतो. पदार्पण करण्यासाठी हेडिंगलेपेक्षा चांगले मैदान नाही. हे खूप खास होते.”

हेही वाचा – काय सांगता..! विराटचा ‘जिगरी दोस्त’ यजुर्वेंद्र चहल CSK कडून खेळणार?

लीड्स येथे खेळल्या जाणार्‍या स्पर्धेच्या ग्रुप ३ सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर यॉर्कशायरने ससेक्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. प्रथम फलंदाजी करताना ससेक्स पहिल्या डावात ३१३ धावांवर बाद झाला.