हिमालयाच्या खोल दऱ्यांमधून.. चिंचोळ्या वाटांमधून मार्ग काढत जेतेपदाची माळ आपल्या गळ्यात टाकण्याच्या चुरशीला म्हणजे ‘रेड दी हिमालया’ या ऑफ रोड मोटार शर्यतीला शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. समुद्रसपाटी पासून सर्वात उंच ठिकाणावर घेण्यात येणारी ही जगातिल एकमेव शर्यत आहे. सहा दिवसांच्या या शर्यतीत १५० शर्यतपटू जवळपास २००० किलोमीटरचे अंतर पार करून जेतेपद पटकाण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या शर्यतपटूंमध्ये १० महिला शर्यतपटूंचा समावेश आहे. मारुती सुझुकी प्रायोजक असलेल्या या शर्यतीला स्वित्र्झलडच्या फेडरेशन इंटरनॅशनल ऑटोमोबाईल (एफआयए) आणि फेडरेशन इंटरनॅशनल मोटरसायकल (एफआयएम) यांची मान्यता आहे. केवळ चारचाकी वाहनांसाठी नव्हे, तर दुचाकीस्वारांचा थरारही शर्यतीत अनुभवता येणार आहे. शिमला येथील क्विन ऑफ हिल येथून सुरू होणारी ही शर्यत श्रीनगर येथे संपणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा