कुआंतम, मलेशिया येथे १४ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या कनिष्ठ पुरुष आशिया चषक हॉकी स्पर्धेकरिता भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १८ जणांचा समावेश असलेल्या या संघाचे नेतृत्व हरजित सिंग याच्याकडे सोपविण्यात आले आहे. या स्पध्रेत आठ संघांचा समावेश असणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या सुलतान जोहोर चषक स्पध्रेत हरजीतला सामनावीराच्या किताबाने गौरविण्यात आले होते. या स्पध्रेत भारताला अंतिम सामन्यात ग्रेट ब्रिटनकडून अटीतटीच्या क्षणी पराभव पत्करावा लागला होता.
‘‘मलेशियामध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आम्हाला आहे आणि सुलतान जोहोर चषक स्पध्रेतील कामगिरीमुळे आमचा अनुभव ताजा आहे,’’ असे मत संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी व्यक्त केले.
भारतीय संघ :
गोलरक्षक – सूरज करकेरा, विकास दाहिया; बचावपटू – दिप्सन तिर्की, वरुण कुमार, आनंद लाक्रा, विक्रमजीत सिंग, हरमनप्रीत सिंग; मध्यरक्षक- निळकंठ शर्मा, हरजित सिंग, संता सिंग, मनप्रीत सिंग, मंगल सिंग चहल; आघाडीपटू – मनदीप सिंग, सुमीत कुमार, अरमान कुरेशी, गरुजत सिंग, मोहम्मद उमर, अजित कुमार पांडे.