India vs Australia 2023 2nd ODI Match Updates in Marathi : बॉर्डर गावसरकर ट्रॉफीनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात पहिल्या सामन्यात भारताने ५ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे आज विशाखापट्टण येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला मालिका खिशात घालण्याची संधी आहे. गुढीपाडव्याच्या आधी एकदिवसीय मालिका जिंकून मैदानात टीम इंडिया विजयाची गुढी उभारणार का? हे पाहावं लागणार आहे. तत्पुर्वी या सामन्यात तीन विक्रम मोडण्याची संधी आहे.

पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून ऑस्ट्रेलियाला १८८ धावांवर गारद केलं होतं. वानखेडेची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरल्याने फलंदाजीला उतरल्यानंतर टीम इंडियाचीही दाणादाण उडाली होती. ८३ धावांवर भारताचे ५ फलंदाज माघारी परतले होते. पण के एल राहुलच्या नाबाद (७५) आणि रविंद्र जडेजा (४५) धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या

स्टीव्ह स्मिथ ODI मध्ये पूर्ण करणार ५००० धावा?

भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथची वनडे क्रिकेटमध्ये ५ हजार धावा करण्याची संधी हुकली. पण आजच्या सामन्यात स्मिथला ५ हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. स्मिथने ६१ धावांची खेळी साकारल्यास तो वेगवान ५ हजार धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज ठरेल. स्मिथ विशाखापट्टणममध्ये १२६ वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळत आहे. सध्या हा विक्रमक डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. त्याने ११५ इनिंग्समध्ये ५ हजार धावा केल्या आहेत. तसंच विक्रमाच्या क्रमवारीत अॅरन फिंचही दुसऱ्या स्थानावर आहे.

के एल राहुलला हा विक्रम करण्याची संधी

मागील सामन्यात टीम इंडियासाठी झुंझार खेळी करणारा के एल राहुल एक नवा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे. राहुलने वनडे क्रिकेटमध्ये ५० इनिंगमध्ये १९४५ धावा कुटल्या आहेत. त्यामुळे २००० धावा पूर्ण करण्यासाठी राहुलला आजच्या साामन्यात ५५ धावांची खेळी साकारावी लागणार आहे. राहुलने आजच्या सामन्यात २ हजारा धावांचा टप्पा गाठला, तर राहुल वनडे क्रिकेटमध्ये वेगवान २ हजार धावा करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरेल. शिखर धवन या विक्रमाच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. ४८ इनिंगमध्ये त्याने २ हजार धावा केल्या आहेत.