R. Ashwin on Virat Kohli, IND vs PAK: भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा अतिशय हुशार आणि चतुर क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. तो आपली रणनीती अतिशय काळजीपूर्वक आखतो. भारतासाठी २७० सामने खेळलेल्या अश्विनने गोलंदाजीद्वारे प्रतिस्पर्ध्यांना अनेक वेळा नेस्तनाबूत करत प्रभावित केले आहे, परंतु फलंदाजीतही त्याने अद्भुत कामगिरी केली आहे. एक फलंदाज म्हणून त्याने अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. यादरम्यान त्याने टी२० विश्वचषक २०२२मध्ये पाकिस्तानी गोलंदाजाच्या अशा चेंडूचा सामना केला, ज्याचा तो दररोज झोपण्यापूर्वी विचार करतो आणि तो क्षण आठवत राहतो.

ICC सोबतच्या संभाषणात आर. अश्विनने पाकिस्तान विरुद्धच्या त्या सामन्यातील थरारक क्षणांचे वर्णन केले आहे. त्याने सांगितले की, “जेव्हा तो हजारो लोकांनी खचाखच भरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न स्टेडियममध्ये फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्यावर टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी दबाव होता, तोही पाकिस्तानविरुद्ध. ही घटना २०२२च्या टी२० विश्वचषकाची आहे. जिथे भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज होती आणि आर. अश्विन स्ट्राइकवर होता.”

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार

कार्तिक आऊट झाल्यावर अश्विन संतापला

भारताचा स्टार फिरकीपटू अश्विनने सांगितले की, “जेव्हा शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर दिनेश कार्तिक बाद झाला, तेव्हा मला त्याचा खूप राग आला होता. त्याच्यामुळे मला सर्वात कठीण काम करावे लागले. जेव्हा मी क्रिजवर गेलो तेव्हा लोकांचे आवाज ऐकून समजले होते की ही किती मोठी संधी आहे पण त्याचबरोबर काही चुकीचे घडले तर शिव्यापण पडतील.”

कोहलीने चेंडू सात शोट्सचे मला पर्याय दिले होते- अश्विन

अश्विनने पुढे बोलतना म्हंटले की, “कोहलीने मला एक चेंडू खेळण्यासाठी सात शोट्सचे पर्याय दिले होते.” कसोटीत पाच शतके झळकावणारा हा फलंदाज म्हणाला, “कोहलीने मला तो एक चेंडू खेळण्यासाठी सात पर्याय दिले. जर तो शॉट मी खेळू शकलो असतो, तर मी आठव्या क्रमांकावर थोडाच फलंदाजीला आलो असतो. कोहलीच्या डोळ्यात जोश होता. नवाज गोलंदाजीला असल्याने मी थोडा खुश होतो कारण, तो फिरकी गोलंदाज होता. नवाजने टाकलेला तो चेंडू खूप लेग साईडला जात होता म्हणून मी ते सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो वाइड निघाला. माझा अंदाज खरा ठरला त्यावेळी मला समजले की आपण आता सामना जिंकणार आहोत.”

हेही वाचा: Ashes Series: “काय मस्करी सुरु आहे का? लज्जास्पद…”; लॉर्डस मधील इंग्लंडच्या कामगिरीवर माजी खेळाडू केविन पीटरसन भडकला

शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या होत्या

पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकण्यासाठी भारताला शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती. दिनेश कार्तिक बाद झाला आणि आर. अश्विन शेवटचा चेंडू खेळायला आला. अश्विन आणि विराटमध्ये काही संवाद झाला. अश्विनने स्ट्राईक घेतला आणि त्यावेळी नवाज गोलंदाजी करत होता. यानंतर अश्विनने मिडऑफच्या दिशेने चौकार ठोकून भारताच्या विजयाच्यावर शिक्कामोर्तब केले. अशा प्रकारे भारताने २०२१मधील पराभवाचा बदला घेतला होता.

हेही वाचा: Team India: बुमराह, श्रेयस, के.एल.राहुलच्या बाबतीत आली नवीन अपडेट; वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियात होणार पुनरागमन?

अश्विनला रोज रात्री तो चेंडू आठवतो

अश्विनने सांगितले की, “रोज झोपण्यापूर्वी तो त्या एका चेंडूचा विचार करतो, जर तो चेंडू पॅडला लागला असता तर काय झाले असते. मात्र, हा सामना आपल्याच हातात होता आणि तो संपवण्याचे काम माझ्याहातून  लिहिले होते असे वाटते. भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. चाहत्यांनी कॅलेंडरमध्ये १५ ऑक्टोबर ही तारीख बुक केली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान एकाच दिवशी आमनेसामने येणार आहेत. जेव्हा जेव्हा हे संघ आमनेसामने येतात तेव्हा सामना हाय व्होल्टेजचा असेल. यावेळीही असेच काहीसे होणार आहे.”

Story img Loader