यजमान रशियाने ७ सुवर्ण, ४ रौप्य व ६ कांस्यपदके अशी एकूण १७ पदकांची कमाई करीत जागतिक मैदानी स्पर्धेच्या पदक तालिकेत अव्वल स्थान घेतले. या स्पर्धेची रविवारी शानदार समारोप समारंभाने सांगता झाली.
अमेरिकेने ६ सुवर्ण, १३ रौप्य व ६ कांस्यपदकांसह एकूण २५ पदके मिळवित दुसरे स्थान घेतले. जमैकाने ६ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य अशी एकूण ९ पदके मिळवली. त्यामध्ये युसेन बोल्ट व शैली अ‍ॅन फ्रेझर यांनी प्रत्येकी तीन सुवर्णपदके मिळवत महत्त्वाचा वाटा उचलला. केनियाने ५ सुवर्ण, ४ रौप्य व ३ कांस्यपदके मिळविली तर जर्मनीने ४ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्यपदक अशी एकूण ७ पदके जिंकली.
या स्पर्धेच्या समारोप समारंभास आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष लॅमिनी दियाक उपस्थित होते. ही स्पर्धा अतिशय नीटनेटक्या रीतीने आयोजित करणाऱ्या रशियन संघटकांचे कौतुक केले. तसेच पुढच्या जागतिक स्पर्धेत असाच अव्वल दर्जा पहावयास मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा