आगामी २०१८/१९ रणजी हंगामासाठी गटवारी जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामासाठी ४ गटांमध्ये संघांची विभागणी करण्यात आलेली आहे. एलिट अ आणि ब गटात ९ संघांना स्थान देण्यात आलं असून क गटामध्ये १० संघांना जागा देण्यात आली आहे. याचसोबत बिहार आणि इशान्येकडील राज्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष गटातही ९ राज्यांना स्थान देण्यात आलं आहे. रणजीच्या मागच्या हंगामाचे विजेते विदर्भ आणि मुंबई यांना एकाच गटात स्थान देण्यात आलं आहे.

आगामी हंगामासाठी अशी असेल रणजी करंडकाची गटवारी –

अ गट : बडोदा, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, मुंबई, रेल्वे, सौराष्ट्र, विदर्भ

ब गट : दिल्ली, बंगाल, केरळ, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, हैदराबाद, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू

क गट : आसाम, गोवा, हरियाणा, जम्मू आणि काश्मिर, झारखंड, ओडीशा, सेनादल, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश

विशेष गट : बिहार, मणिपूर, मेघालया, मिझोराम, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, उत्तराखंड

Story img Loader