तीन वर्षांपूर्वी यशस्वी आयोजन करणाऱ्या भारताला आठ वर्षांत दुसऱ्यांदा हॉकी विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. हॉकीचाहत्यांना २०१८ साली पुरुषांचा हॉकी विश्वचषक पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. १६ संघांमध्ये रंगणारी ही स्पर्धा १ ते १६ डिसेंबरदरम्यान होणार आहे. महिलांची हॉकी विश्वचषक स्पर्धा ७ ते २१ जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये होणार आहे. लुसाने, स्वित्र्झलड येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात याबाबतची घोषणा करण्यात आली.
‘‘इंग्लंड आणि भारताने २०१८ सालच्या हॉकी विश्वचषक आयोजनात बाजी मारली आहे. दोन्ही देशांनी सादर केलेल्या विविधा अन्य देशांपेक्षा वेगळ्या होत्या. या दोन्ही देशांत होणाऱ्या स्पर्धाचा दर्जा निश्चितच सरस असेल, अशी आशा आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष लिआंड्रो नेग्रे यांनी सांगितले.

Story img Loader