प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेला चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेजिकोवाच्या रुपात सलग आठव्या वर्षी नवविजेती मिळाली. शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत १ तास ५६ मिनिटांच्या संघर्षानंतर क्रेजिकोवाने इटलीच्या जॅस्मिन पाओलिनीचे आव्हान ६-२, २-६, ६-४ असे परतवून लावले. क्रेजिकोवाचे हे विम्बल्डनमधील पहिले, तर कारकीर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. यापूर्वी क्रेजिकोवाने २०२१ मध्ये फ्रेंच स्पर्धा जिंकली होती.

हेही वाचा >>> IND vs SL : भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या आता कधी होणार सामने?

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी

अंतिम लढतीत क्रेजिकोवाला पाओलिनीचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. मात्र, फ्रेंच स्पर्धेपाठोपाठ विम्बल्डन स्पर्धेतही पाओलिनीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे इटलीची पहिली विजेती होण्याचे सातव्या मानांकित पाओलिनीचे स्वप्न अधुरेच राहिले. आजारपण आणि पाठीची दुखापत यामुळे क्रेजिकोवाला यंदाच्या हंगामात सातत्याने खेळता आलेले नाही. याचा तिच्या क्रमवारीवरही परिणाम झाला. विम्बल्डन स्पर्धेसाठी ३२ महिला टेनिसपटूंना मानांकन देण्यात आले होते, ज्यापैकी ३१वे मानांकन क्रेजिकोवाला होते. मात्र, तिने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अखेर जेतेपदावर मोहोर उमटवली.

अंतिम लढतीत क्रेजिकोवाने पहिल्या सेटमध्ये एकतर्फी वर्चस्व राखले होते. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये ती आत्मविश्वास गमावून बसल्यासारखी वाटली. पाओलिनीनने याचा फायदा घेऊन तितक्याच सहजतेने दुसरा सेट जिंकून सामन्यात रंगत निर्माण केली होती. तिसऱ्या सेटमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाला होता. क्रेजिकोवाने तिसऱ्या गेममध्ये ब्रेकची संधी साधून आघाडी मिळवली. मात्र, पाओलिनीने अखेरपर्यंत प्रयत्न सोडले नव्हते. निर्णायक क्षणी पाओलिनीने दोन ‘मॅच पॉइंट’ वाचवले. परंतु, यापुढे ती प्रतिकार करू शकली नाही आणि आणि क्रेजिकोवाचे विजेतेपद निश्चित झाले. अंतिम लढतीत अचूक सर्व्हिस हे क्रेजिकोवाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

चेक प्रजासत्ताकची पाचवी टेनिसपटू

सेरेना विल्यम्सच्या २०१६ मधील विजेतेपदानंतर सलग आठव्यांदा महिला एकेरीत नवविजेती मिळाली असली, तरी सलग दुसऱ्या वर्षी महिला एकेरीचे विजेतेपद चेक प्रजासत्ताककडे गेले आहे. गतवर्षी चेक प्रजासत्ताकचीच मार्केटा वॉन्ड्रोउसोवा विजेती ठरली होती. विम्बल्डनचे विजेतेपद मिळवणारी क्रेजिकोवा चेक प्रजासत्ताकची एकूण पाचवी महिला टेनिसपटू आहे. यापूर्वी मार्टिना नवरातिलोवाने नऊ वेळा, तर याना नोव्होत्ना, पेट्रा क्विटोवाने दोनदा, तर वॉन्ड्रोउसोवाने एकदा ही स्पर्धा जिंकली आहे.

Story img Loader