Pat Cummins IND vs AUS: भारत दौऱ्याच्या आठवडाभरापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार पॅट कमिन्स पुन्हा वादात सापडला आहे. कमिन्सवर त्याच्या पर्यावरण विरोधी विचारांमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला $४० दशलक्ष (रु. २३१ कोटी ५० लाख ९६ हजार चारशे) चे नुकसान झाल्याचा आरोप आहे. कमिन्स या दाव्यांना जोरदार विरोध करत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी प्रायोजकांच्या जाहिरातींमध्ये येण्यास नकार दिल्याने संपूर्ण प्रकरण सुरू झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कमिन्सने आरोप खोडून काढले
सिडनी मॉर्निंग हेराल्डने वृत्त दिले आहे की कमिन्स यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी निक हॉकली यांच्याशी झालेल्या बैठकीत अलिंटा एनर्जीसोबत राष्ट्रीय संघाच्या कराराबद्दल चिंता व्यक्त केली. त्यानंतर Alinta Energy ने जून २०२३ नंतर प्रायोजकत्व कराराचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला. कमिन्सने न्यूज कॉर्प्सला सांगितले की, “मी ज्या पदावर आहे त्यामुळेच विविध वादांनी घेरलो गेलो. आयुष्यात अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. हे माझ्यासाठी काही नवीन नाही असे मत तयार करायला आजच्या जगात फार वेळ लागत नाही. मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तींबाबत असे मतबनवतात आज माझ्या बाबतीत झाले उद्या ते तुमच्याबद्दल मत बनवतील.”
कमिन्स पुढे म्हणाला, ‘मी फक्त प्रयत्न करत राहते आणि माझ्या आयुष्यात थोडा बदल करण्यासाठी खूप काही करतो. जर मी माझ्या कृतींद्वारे किंवा क्रिकेट फॉर क्लायमेटच्या माध्यमातून थोडासा फरक करू शकलो, तर लोक त्यात दोष शोधून मला त्रास होत नाही. संघाचे नेतृत्व करणे आणि माझे सर्वोत्तम देणे हे माझे काम आहे. मला आवडलेल्या इतर काही गोष्टी असतील तर मी त्या वेळोवेळी शेअर करण्याचा विचार करू शकतो.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका पुढील महिन्यात ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही कसोटी मालिका खूप महत्त्वाची आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाचा उत्साह सातव्या आकाशावर आहे. दुसरीकडे स्टीव्ह स्मिथसारखा फलंदाज धोकादायक फॉर्ममध्ये परतणे ऑस्ट्रेलियासाठी दिलासादायक ठरेल.
स्टीव्ह स्मिथ सध्या बिग बॅश लीगमध्ये धुमाकूळ घालत आहे. बीबीएलच्या या चालू हंगामात स्मिथने सिडनी सिक्सर्सकडून खेळताना सलग दोन शतके आणि अर्धशतके झळकावली आहेत. स्मिथने अॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध १०१ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. पुढच्याच सामन्यात त्याने सिडनी थंडर्सचा पराभव करताना नाबाद १२५ धावा केल्या. त्यानंतर हॉवर्ड हरिकेन्सविरुद्ध ६६ धावांची स्फोटक खेळी खेळली गेली.
ऑस्ट्रेलियन संघाला फेब्रुवारी-मार्चमध्ये भारताविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल ६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येत आहे. याआधी २०१७ मध्ये भारतीय भूमीवर दोन्ही देशांदरम्यान शेवटची कसोटी मालिका खेळली गेली होती. त्या चार सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने २-१ असा विजय मिळवला.