Sachin 50th Birthday: भारतीय संघाचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी मुंबईत झाला. १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सचिनने देशात क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेण्यात खूप महत्वाची भूमिका बजावली.

सचिन तेंडुलकरचा जन्म २४ तारखेला झाला असून त्याचे तारखेशी खूप खास नाते आहे. सचिनच्या आयुष्यातील ही सर्वात महत्त्वाची तारीख आहे. या दिवशी त्याने अनेक विक्रम केले आहेत. त्याचबरोबर त्याचा विवाहही याच दिवशी झाला. सचिन तेंडुलकरचा विवाह २४ मे १९९५ रोजी अंजलीसोबत झाला होता. सचिन आणि अंजलीच्या पहिल्या अपत्याचा, त्यांच्या मुलाचाही जन्म २४ तारखेला झाला. अर्जुन तेंडुलकरचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ रोजी झाला.

aditya roy kapoor
रुपेरी पडद्यावरील सच्चा प्रेमी आदित्य रॉय कपूर खऱ्या आयुष्यात पडला ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
aitraaz movie seqwel
अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
actor himansh kohli wedding photos out
बॉलीवूड अभिनेत्याने मंदिरात साधेपणाने केलं अरेंज मॅरेज; लग्नातील फोटो आले समोर
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अनेक टप्पे गाठले –

कुटुंबाव्यतिरिक्त सचिन तेंडुलकरने २४ तारखेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक टप्पे गाठले आहेत. सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द १९८९-२०१३ म्हणजेच २४ वर्षांची होती. या दिवशी म्हणजेच २४ तारखेला सचिनने ६६४* धावांची मोठी भागीदारीही केली होती. त्यानंतर त्याला भारतीय संघात कायमस्वरूपी स्थान मिळाले. याशिवाय त्याने या तारखेला इतरही अनेक मोठे विक्रम केले आहेत.

हेही वाचा – IPL 2023 CSK vs KKR: ‘धोनी रिव्ह्यू सिस्टीम’ पुन्हा एकदा ठरली सरस, पाहा कसा बदलावा लागला पंचांना निर्णय?

२४ फेब्रुवारी १९८८: विनोद कांबळीसोबत ऐतिहासिक भागीदारी –

सचिन तेंडुलकर २४ फेब्रुवारी १९८८ रोजी म्हणजे ३५ वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आला होता, त्यामुळेच त्याला क्रिकेट जगतात ओळख मिळाली आणि त्याचे नाव जगभर गाजले. खरं तर, या दिवशी त्याने हॅरिस शिल्डच्या उपांत्य फेरीत विनोद कांबळीसह विक्रमी नाबाद ६६४ धावांची भागीदारी केली होती. त्या भागीदारीत सचिन ३२६ आणि विनोद कांबळी ३४९ धावांवर नाबाद होते. ही ऐतिहासिक भागीदारी होती. यामुळे त्याला १९८९ मध्ये भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली.

२४ नोव्हेंबर १९८९ : पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास –

या दिवशी वयाच्या १६ व्या वर्षी सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक (५९ धावा) झळकावले होत. फैसलाबाद येथे पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या दौऱ्यात त्याने सर्वात कमी वयात ही कामगिरी करून इतिहास रचला होता.

हेही वाचा – RCB vs RR: सामन्यादरम्यान विराट कोहली झाला रोमँटिक, अनुष्का शर्माला दिला फ्लाइंग किस, VIDEO व्हायरल

२४ फेब्रुवारी २०१०: द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला –

२४ फेब्रुवारी २०१० रोजी म्हणजेच १३ वर्षांपूर्वी सचिनने ग्वाल्हेरच्या कॅप्टन रूपसिंग स्टेडियमवर ती ऐतिहासिक खेळी खेळली, जी कोणीही विसरु शकणार नाही. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २०० धावांची खेळी करून वनडे क्रिकेटच्या ३९ वर्षांच्या इतिहासातील पहिले द्विशतक झळकावले. त्याच्यानंतर अनेक खेळाडूंनी या पराक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. सचिनने १४७ चेंडूत २०० धावा केल्या होत्या.