‘दगडावर दगडी सात’ म्हणजेच ‘लगोरी’. ठाण्यात लगोरी आंतराष्ट्रीय स्तरावर खेळविण्यात येत आहे. नागोठणे येथे आंतराष्ट्रीय लगोरी स्पर्धेला सुरूवात झाली असून पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळविला आहे.
महाराष्ट्र लगोरी असोसिएशनने पुढाकार घेत भारत लगोरी असोसिएशनच्या माध्यमातून ठाण्यात ही चार दिवसीय आंतराष्ट्रीय लगोरी स्पर्धा आयोजित केली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने केनियाचा २५-९, ८-२ पराभव करत पुढच्या फेरीत आगेकूच केली आहे. यावेळी आंतराष्ट्रीय लगोरी असोसिएशनचे सचिव संतोष गुरव म्हणाले की, या स्पर्धेमागे लगोरी खेळाला आंतराष्ट्रीय स्तरावर बळकटी आणि प्रोत्साहन देणे हे उद्दीष्ट आहे. अशा नामशेष होणाऱया खेळांचे अस्तित्व टीकविण्यासाठी अशा स्पर्धा होत राहणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा