पावसाने व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी मात करत पाच सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २२३ धावा केल्या. हे आव्हान पार करताना दक्षिण आफ्रिकेने २१ षटकांत ५ बाद १०४ धावांची मजल मारली. पण मुसळधार पावसामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर २७ षटकांत १७६ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. फिरकीपटू रंगना हेराथने अखेरच्या क्षणी अल्विरो पीटरसन (२४) आणि फॅफ डय़ू प्लेसिस (८) यांचे बळी मिळवले. डेव्हिड मिलर (नाबाद २२) आणि रायन मॅकलॅरेन (नाबाद १४) यांनी सहाव्या विकेटसाठी ३५ धावांची भर घालत प्रतिकार केला. पण दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १७ धावा कमी पडल्या. ४३ धावांची खेळी साकारणाऱ्या दिनेश चंडिमल याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2nd odi sri lanka beat south africa by 17 runs dl
Show comments