माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण आपल्या क्रिकेट अकादमींचा विस्तार वाढवत असल्याचे दिसत आहे. कारण त्याच्या क्रिकेट अकादमी ऑफ पठाणचे ३३वे केंद्र सुरु करण्यात आले आहे. अकादमी ऑफ पठाणचे ३३वे केंद्र हे पनवेल मधील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी मध्ये सुरु केले आहे.
क्रिकेट अकादमी ऑफ पठाण अकादमी मध्ये तंत्रज्ञान, ऑन-ग्राउंड अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेट तज्ञांनी डिझाइन केलेले मॉडेलद्वारे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम क्रिकेटचे धडे शिकवण्यात येणार आहेत. याचा फायदा पनवेलसह अजूबाजूच्या परिसरातील मुलांना होणार आहे. या ठिकाणी भावी भारतीय खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
कॅप अकादमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जाणार आहे. जसे की लाइव्ह फिडबॅक पद्धतीचा वापर करुन खेळाडूला येणाऱ्या समस्यांचे निराकरन केले जाणार आहे. त्याचबरोबर खेळाडू आणि कोच ते पाहून पटकन मैदानवरच त्या समस्येचे निराकरण करतील.
क्रिकेट अकादमी ऑफ पठाण संपूर्ण देशभरात १०० पेक्षा अधिक केंद्र सुरु करणार आहे. याबद्दल स्वत: इरफान पठाणने माहिती दिली. ज्यामुळे देशातील क्रिकेटपटूचे व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. त्यासाठी ही अकादमी सर्वोतोपरी मदत करणार असल्याची प्रतिक्रिया, माजी अस्टपैलू खेळाडू इरफान पठाण यांनी दिली. तो म्हणाला देशातील बऱ्याच भागात अकादमी सुरु केली आहे. तसेच येणाऱ्या काळात देशाबाहेर पठाण अकादमी पाहिला मिळेल.