आम्ही मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेली असली तरी तिसरा सामनाही आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच आम्ही भारतात आलेलो आहोत, असे मत पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हक याने सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. या विजयाचे श्रेय गोलंदाजांना द्यायला हवे. फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी या मालिकेत दर्जेदार कामगिरी केली आहे. इरफान आणि जुनैद यांनी भारताच्या फलंदाजांना आपल्या स्विंगच्या जोरावर हैराण केले, त्याचबरोबर सईद अजमल, मोहम्मद हफिझ आणि शोएब मलिक यांनी फिरकीची धुरा यशस्वीपणे वाहिली आहे. माजी कर्णधार इंझमाम यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला चांगलाच फायदा झाला, असे मिसबाहने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा