भारतीय संघाने नुकतीच विंडीजविरुद्ध टी२० मालिका ३-० अशी जिंकली. त्या आधी दौऱ्याच्या सुरुवातीला कसोटी मालिकेतही भारताने विंडीजला २-० अशी मात दिली. संपूर्ण दौऱ्यात विंडीजला केवळ एकच सामना जिंकता आला. एकदिवसीय मालिकेतील तो सामना होता. ही मालिका भारताने ३-१ने खिशात घातली. या मालिकेत रोहित शर्माने पहिल्या आणि चौथ्या सामन्यात केलेले धमाकेदार दीडशतक हा कौतुकाचा विषय ठरला. पण रोहितने केलेले एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव अडीचशतक हे कायम चाहत्यांच्या स्मरणात आहे.
हा पराक्रम रोहितने आजच्या तारखेलाच केला होता. १३ नोव्हेंबर २०१४ ला भारतासमोर श्रीलंकेचे आव्हान होते. रोहित नेहमीप्रमाणे फलंदाजी आला आणि त्याने एक विश्वविक्रम केला. या सामन्यात रोहितने २६४ धावांची तुफानी केली केली होती. एकदिवसीय क्रिकेटमधील ही आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे. ही २६४ धावांची खेळी रोहितने १७३ चेंडूंमध्ये केली होती. या खेळीत ३३ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. हे रोहितचे एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे द्विशतक होते. त्याआधी रोहितने २ नोव्हेंबर २०१३ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावा केल्या होत्या. तर १३ डिसेंबर २०१७ला त्याने श्रीलंकेविरुद्ध तिसरे द्विशतक लगावले होते.
Runs: 264
Balls faced: 173
4s/6s: 33 & 9
Records broken: Numerous#OnThisDay in 2014, Rohit Sharma smashed the highest individual score in an ODI innings, against Sri Lanka in Kolkata. pic.twitter.com/GsU6LdWyKu— ICC (@ICC) November 13, 2018
दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात पहिले द्विशतक मास्टर ब्लास्टर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने फटकावले होते. त्यानंतर वीरेंद्र सेहवागनेही द्विशतक ठोकले. पण रोहितच्या नावावर आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात तब्बल तीन द्विशतके आहेत.