वाढत्या वयाबरोबर खेळात परिपक्वता आणणाऱ्या सेरेनाने कारकीर्दीतील ७००व्या विक्रमी विजयाची नोंद केली. मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत सबिन लिइस्कीवर मात करत सेरेनाने उपांत्य फेरीत वाटचाल केली. सुरुवातीला चाचपडत खेळणाऱ्या सेरेनाने नंतर मात्र लौकिकाला साजेसा खेळ करत हा विजय मिळवला. या स्पर्धेची सात जेतेपदे नावावर असणाऱ्या सेरेनाने या सामन्यात रॅकेट तोडले, ओरडत रागही व्यक्त केला, तळपत्या सूर्याला उद्देशून शेरेबाजी केली. मात्र लय गवसल्यानंतर लिइस्कीला तिने पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. ताकदवान सव्‍‌र्हिस हे सेरेनाचे मुख्य अस्त्र आहे. मात्र या सामन्यात सेरेनाच्या सव्‍‌र्हिसमधील अचूकता हरवली. तिच्या हातून तब्बल ५१ चुका झाल्या. मात्र या सगळ्यातून सावरत सेरेनाने ऐतिहासिक विजय साकारला. या स्पर्धेतील सेरेनाचा हा सलग १६वा सलग विजय आहे. अव्वल मानांकित सेरेनाचा उपांत्य फेरीत सिमोन हालेपशी मुकाबला होणार आहे.

Story img Loader