830 Indian Players and 336 Foreign Players Participated IPL 2024 Mini Auction : आयपीएल २०२४ पूर्वी मिनी लिलावासाठी एकूण ११६६ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये रचिन रवींद्र आणि ट्रॅव्हिस हेड यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांनी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. मात्र, त्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे नाव नाही, त्याला मुंबई इंडियन्सने करारमुक्त केले आहे. ११६६ खेळाडूंपैकी ८३० खेळाडू भारतीय आहेत. यापैकी १८ कॅप्ड खेळाडू आहेत, परंतु फक्त चार खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएलचा लिलाव १९ डिसेंबरला होणार आहे. या लिलावासाठी ३३६ परदेशी खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. एकूण २१२ कॅप्ड, ९०९ अनकॅप्ड आणि ४५ सहयोगी देशांचे खेळाडू आहेत. भारताच्या कॅप्ड खेळाडूंमध्ये वरुण आरोन, केएस भरत, केदार जाधव, सिद्धार्थ कौल, धवल कुलकर्णी, शिवम मावी, शाहबाज नदीम, करुण नायर, मनीष पांडे, हर्षल पटेल, चेतन साकारिया, मनदीप सिंग, बरिंदर स्रान, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, हनुमा विहारी, संदीप वारियर आणि उमेश यादव यांच्या नावांचा समावेश आहे.

या ४ भारतीय खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी रुपये –

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, हर्षल पटेल, केदार जाधव, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. या सर्व खेळाडूंना फ्रँचायझींनी करारमुक्त केले आहे. उर्वरित १४ कॅप्ड भारतीय खेळाडूंची मूळ किंमत ५० लाख रुपये आहे. जोफ्रा आर्चरने लिलावासाठी आपले नाव का नोंदवले नाही. यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु दुखापतीमुळे तो यंदाच्या लिलावात नसल्याची चर्चा आयपीएल संघांमध्ये होती.

हेही वाचा – Team India : भारताने पाकिस्तानला मागे टाकत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या खेळाडूंची नावे –

मात्र, लिलावात इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी आपली नावे दिली आहेत. यामध्ये विश्वचषक खेळलेल्या आदिल रशीद, हॅरी ब्रूक आणि डेव्हिड मलान या खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, सीन अॅबॉट, जोश इंग्लिस आणि स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे. ज्यांनी त्यांची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवला आहे.

बांगलादेशसह या देशांतील खेळाडूंनी नोंदवली नावे –

बांगलादेशकडून मोहम्मद शरीफुल इस्लाम, हसन महमूद, मेहदी मिराज, मुस्तफिजुर रहमान, महमुदुल्ला आणि तस्किन अहमद यांचा समावेश आहे. एकट्या मुस्तफिजूरची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. तसेच दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, नामिबिया, नेपाळ, नेदरलँड, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेचे खेळाडू आहेत.

फक्त ७७ स्लॉट –

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) फ्रँचायझींना लिलावात हव्या असलेल्या खेळाडूंची नावे सांगण्यास सांगितले असून त्यांनी नावे दिलेली नाहीत. जर खेळाडू पात्र आणि इच्छुक असेल तर त्याचे नाव लिलावात समाविष्ट केले जाईल. फ्रँचायझींनाही लिलावात हव्या असलेल्या खेळाडूंच्या यादीसह रजिस्टरला प्रतिसाद देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फक्त ७७ स्लॉट भरायचे आहेत, त्यापैकी जास्तीत जास्त ३० परदेशी खेळाडू असू शकतात.

हेही वाचा – IPL 2024 : “माझी निवड होईल की नाही याची…”; आयपीएलच्या लिलावाबद्दल रचिन रवींद्रचे मोठे विधान

२ कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू –

हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केदार जाधव, मुजीब उर रहमान, शॉन अॅबॉट, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, मुस्तफिजूर रहमान, टॉम बॅंटन, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, लॉकी फर्ग्युसन, जेराल्ड कोएत्झी, रिले रॉसौ, रॅसी व्हॅन डर डुसेन, अँजेलो मॅथ्यूज.

१.५ कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू –

मोहम्मद नबी, मॉइसेस हेन्रिक्स, ख्रिस लिन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, डॅनियल वॉरॉल, टॉम कुरन, मर्चंट डी लँग, ख्रिस जॉर्डन, डेविड मलान, टायमल मिल्स, फिल सॉल्ट, कोरी अँडरसन, कॉलिन मुनरो, जिमी नीशम, टीम साउदी, कॉलिन इंग्राम, वानिंदू हसरंगा, जेसन होल्डर, शेरफेन रदरफोर्ड.

हेही वाचा – World Cup 2024 : रोहित शर्माबद्दल सौरव गांगुलीचे मोठं वक्तव्य! म्हणाला, “टी-२० विश्वचषकात त्याला…”

१ कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू –

अॅश्टन आगर, रिले मेरेडिथ, डी’आर्सी शॉर्ट, अॅश्टन टर्नर, गुस ऍटकिन्सन, सॅम बिलिंग्स, मायकेल ब्रेसवेल, मार्टिन गुप्टिल, काइल जेमिसन, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, अल्झारी जोसेफ, रोव्हमन पॉवेल, डेव्हिड विस.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 830 indian and 336 foreign players registered for ipl 2024 mini auction vbm
Show comments