भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या रोहित शर्माने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५३ आंतरराष्ट्रीय सामन्यात तब्बल ८९ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम ख्रीस गेलच्या नावावर होता. त्याने इंग्लंड विरुद्ध ८८ षटकार मारले आहेत. तिसऱ्या स्थानावरील शाहिद आफ्रिदीने ८६ षटकार श्रीलंका संघाविरुद्ध मारले आहेत.
दुसऱ्या सामन्या रोहित शर्माचे अर्धशतक थोडक्यात हुकले. रोहित शर्माने ४३ धावांची खेळी केली. रोहित शर्माने ५२ चेंडूचा सामना करताना २ षटकार आणि २ चौकराच्या मदतीन ४३ धावांची खेळी केली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माना एकतर्फी झूंज देताना शतकी खेळी केली होती.दुसऱ्या टोकाला फलंदाजांनी साथ न दिल्यामुळे भारताला पराभवाचा धक्का बसला होता. तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया १-० ने आघाडीवर आहे. दुसरा सामना जिंकून भारत १-१ बरोबरी करण्याचा प्रयत्न करणार आहे.