How many ways a batsman can be dismissed: काळाच्या ओघात लोकांची क्रिकेटबद्दलची आवड सातत्याने वाढली आहे. क्रिकेट आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. आता बहुतेक देशांनी अधिकृतपणे क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत फुटबॉलनंतर क्रिकेटचा दुसरा क्रमांक लागतो. आज आपण क्रिकेटबद्दल एक महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. क्रिकेटमध्ये एक फलंदाज किती प्रकारे आऊट होवू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर जाणून घेऊया. क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये एक फलंदाज १० प्रकारे आऊट होऊ शकतो. चला जाणून घेऊया फलंदाज बाद होण्याचे सर्व नियम.
१. बोल्ड आऊट
जेव्हा गोलंदाजाचा कायदेशीर चेंडू सरळ स्टंपवर आदळतो, तेव्हा फलंदाज बोल्ड आऊट मानला जातो. चेंडू थेट आदळला असो किंवा बॅट आणि शरीराला स्पर्श करून स्टंपला आदळला असो, प्रत्येक प्रकारे तो आऊट मानला जातो.
२. कॅच आऊट
क्रिकेट मॅचमध्ये अनेक विकेट्स कॅच घेतल्यामुळे पडतात. जेव्हा एखादा फलंदाज हवेत शॉट खेळतो आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा क्षेत्ररक्षक चेंडू जमिनीवर न पडता सीमा रेषेच्या आत पकडतो, तेव्हा तो कॅच आऊट मानला जातो. एक कॅच तुम्हाला सामना जिंकवू शकतो आणि हरवूही शकतो.
हेही वाचा – Pakistani Players Salary: आता पाकिस्तानी खेळाडूही होणार कोट्याधीश, तरीही भारतीय खेळांडूच्या तुलनेत खूपच मागे
३. लेग बिफोर विकेट (एलबीडब्ल्यू )
जर चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागला नाही आणि थेट त्याच्या शरीरावर किंवा पॅडवर लागला आणि त्यावेळ स्टंपच्या समोर असेल, तर त्याला एलबीडब्ल्यू आऊट मानले जाते. कारण फलंदाज आडवा नसता तर तो बोल्ड झाला असता.
४. रन आऊट
धावा पूर्ण करण्यासाठी फलंदाजाला पळत जाऊन क्रीजच्या आत जावे लागते. जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने फलंदाज क्रीझमध्ये पोहोचण्यापूर्वी स्टंपला चेंडू मारला, तर फलंदाजाला रन आऊट दिले जाते.
५. स्टंपिंग आऊट
फलंदाजाला मर्यादित जागेत फलंदाजी करावी लागते, या जागेला क्रीज म्हणतात. जर फलंदाज खेळत असताना क्रीझच्या बाहेर आला आणि चेंडू मागे उभ्या असलेल्या यष्टीरक्षकाकडे गेला, तर यष्टीरक्ष चेंडू स्टंपवर मारुन फलंदाजाला बाद करतो, त्याला स्टंपिंग आऊट म्हणतात.
६. हिट विकेट
फलंदाजी करताना फलंदाजाच्या शरीराचा किंवा बॅटचा कोणताही भाग स्टंपला लागला, तर अशा स्थितीत फलंदाजाला हिट विकेटद्वारे आऊट घोषित केले जाते.
७. क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण करणे
एखाद्या फलंदाजाने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास जाणीवपूर्वक अडथळा आणला किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या थ्रोसमोर आल्यास, अशा स्थितीत फलंदाजाला आऊट घोषित केले जाते.
८. टाइम आऊट
एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाला क्रीजवर पोहोचण्यासाठी थोडा वेळ दिला जातो. जर दुसरा फलंदाज वेळेवर क्रीझवर पोहोचला नाही, तर त्याला टाईमआऊटद्वारे आऊट केले जाते. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजाला क्रीजवर येण्यासाठी २ मिनिटे आणि आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ९० सेकंद मिळतात.
हेही वाचा – County Cricket : पृथ्वी शॉ पहिल्याच बॉलवर पुल शॉट मारायला गेला, अन् थेट स्टंपवर…, VIDEO होतोय व्हायरल
९. मंकाडिंग आऊट
जर नॉन-स्ट्रायकरच्या टोकावरील फलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी क्रीज सोडत असेल, तर गोलंदाज नॉन-स्ट्रायकरच्या टोकावरील चेंडूने स्टंपवर त्याला आऊट करू शकतो. याला मंकाडिंग आऊट म्हणतात.
१०. हँडल्द द बॉल
सामना सुरु असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या परवानगीशिवाय फलंदाजाने चेंडू पकडला किंवा अडवला, तर अशा स्थितीत फलंदाजाला आऊट दिले जाते.