Pakistan Bowling Coach Resigns: विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान संघात राजीनाम्याची चढाओढ सुरू झाली आहे. पाकिस्तानचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल याने सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल सहा महिन्यांच्या करारावर जूनमध्ये संघात सामील झाला होता.
बाबर आझम अँड कंपनी २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी नऊ पैकी फक्त चार सामने जिंकून बाद फेरीसाठी पात्र ठरण्यात अयशस्वी ठरल्यानंतर मॉर्केलने पद सोडण्याचा निर्णय घेतला. पीसीबीने मॉर्केलच्या बदली दुसरे नाव दिलेले नाही आणि योग्य वेळी याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यानंतर पाकिस्तानला डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे, ज्यामध्ये ते तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत.
विश्वचषकात पाकिस्तानने आपल्या मोहिमेत विजय मिळवून चांगली सुरुवात केली होती. भारताविरुद्धच्या पराभवानंतर त्यांची खराब कामगिरी सुरु झाली. त्यांनी त्यानंतर सलग चार सामने गमावले. इंग्लंडविरुद्धच्या त्यांच्या अंतिम साखळी टप्प्यातील सामन्यात उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची त्यांची शक्यता जवळपास संपल्यात जमा होती. संघाला ६.४ षटकांत ३३८ धावांचे मोठे लक्ष्य गाठावे लागणार होते, जे की अशक्य होते.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरण्याची ही सलग पाचवी वेळ होती. या मोहिमेने पाकिस्तानची जागतिक दर्जाची गोलंदाजी आणि फलंदाजीतील कच्चे दुवे उघड झाले आहेत. माजी विश्वचषक विजेता आणि महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने संघाच्या खराब कामगिरीचे खापर वेगवान गोलंदाजांवर फोडले आहे. “या विश्वचषकात पाकिस्तानसाठी समस्या ही होती की आमची वेगवान गोलंदाजीने खूप संघर्ष केला,” तो ए स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला.
शनिवारी झालेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, इंग्लंडने विश्वचषकातील त्यांच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा ९३ धावांनी पराभव केला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही आपले स्थान निश्चित केले. इंग्लंडने ही विश्वचषक मोठी सातव्या स्थानावर संपवली. त्यांनी शेवटचे दोन सामने जिंकून सहा गुण मिळवले आणि २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ते पात्र ठरले आहेत.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत नऊ गडी गमावून ३३७ धावा केल्या, त्यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या अपेक्षेला धूळ चारली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ४३.३ षटकांत २४४ धावाच करू शकला कारण त्यांच्या फलंदाजांना ना आदिल रशीदच्या गुगलीचा फायदा उठवता आला ना डेव्हिड विलीचा धारदार स्विंग चेंडू खेळता आला. पाकिस्तानला ४० चेंडूत ३३८ धावांचे लक्ष्य गाठायचे असल्याने त्यांना छाप पाडण्याची कोणतीही संधी नव्हती. त्यांच्या फलंदाजांनी ४० चेंडूत ४० षटकार ठोकले असते तरीही त्यांना इंग्लंडची धावसंख्या ओलांडता आली नसती आणि निव्वळ धावगतीच्या आधारावर न्यूझीलंडला मागे टाकता आले नसते.
मागील सामन्यांप्रमाणे या सामन्यातही पाकिस्तानच्या फलंदाजांनी संथ फलंदाजी केली. आक्रमक होण्याऐवजी त्यांनी बचावाला अधिक महत्त्व दिले. बाबर (४५ चेंडूत ३८ धावा) आणि मोहम्मद रिझवान (५१ चेंडूत ३६ धावा) या पाकिस्तानी फलंदाजीच्या दोन आधारस्तंभांना संघर्ष करावा लागला. अब्दुल्ला शफीक (०) आणि फखर जमान (१) हे दोघेही फ्लॉप ठरले. सौद शकील २९ धावा आणि इफ्तिखार अहमद तीन धावा करून बाद झाला. आघा सलमानने ४५ चेंडूत ५१ धावांची चांगली खेळी केली. यापूर्वी पाकिस्तानच्या गोलंदाजाची कामगिरीही खराब होती. शाहीन आफ्रिदीने १० षटकात ७२ धावा देत २ विकेट्स घेतल्या आणि हारिस रौफने १० षटकात ६४ धावा देत तीन विकेट्स घेतल्या.