Record for most 1000 runs in a calendar year: विराट कोहलीसाठी २०२३ चा विश्वचषक आत्तापर्यंत चांगलाच ठरला आहे. या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा विराट हा दुसरा फलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या गेल्या सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला होता, आता हे विसरून विराटला पुन्हा एकदा मोठी खेळी खेळायला आवडेल. त्याचवेळी, श्रीलंकेसोबतच्या आजच्या सामन्यात विराट कोहलीच्या नावावर भारताचा माजी सलामीवीर सचिन तेंडुलकरचा खास विक्रम आहे. विराट हा विक्रम मोडण्यापासून फक्त ३४ धावा दूर आहे.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा हजार धावा करण्याचा विक्रम –
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक १००० धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने सात वेळा हा पराक्रम केला आहे. याशिवाय विराट कोहलीने एका कॅलेंडर वर्षात सात वेळा एक हजारहून अधिक धावा केल्या आहेत. आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकण्याची सुवर्णसंधी आहे. या वर्षी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९६६ धावा केल्या आहेत.
आशिया कप २०२२ नंतर विराटने हरवलेला फॉर्म परत मिळवला आहे. त्याआधी विराट सुमारे अडीच वर्षे सतत फ्लॉप होत होता आणि एकही शतक त्याला झळकावता आले नाही, पण आता विराटच्या बॅट चांगली तळपत आहे. तो प्रत्येक सामन्यात धावा करत आहे. आज विराट कोहलीने ३४ धावा केल्या तर तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात आठ वेळा १००० धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज बनेल. सचिन तेंडुलकरने १९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३ आणि २००७ साली १००० धावांचा टप्पा पार केला होता.
विराटने एक हजार धावा कधी-कधी केल्या आहेत?
वर्ष २०११: ३४ सामन्यांमध्ये ४७.६२च्या सरासरीने १३८१ धावा (४ शतके आणि ८ अर्धशतके)
वर्ष २०१२: १७ सामन्यात ६८.४०च्या सरासरीने १०२६ धावा (५ शतके आणि ३ अर्धशतके)
वर्ष २०१३: ३४ सामन्यात ५२.८३ च्या सरासरीने १२६८ धावा (४ शतके आणि ७ अर्धशतके)
वर्ष २०१४: २१ सामन्यांमध्ये ५८.५५ च्या सरासरीने १०५४ धावा (४ शतके आणि ५ अर्धशतके)
वर्ष २०१७: २६ सामन्यांमध्ये ७६.८४ च्या सरासरीने १४६० धावा (६ शतके आणि ७ अर्धशतके)
वर्ष २०१८: १४ सामन्यात १३३.५५ च्या सरासरीने १२०२ धावा (६ शतके आणि ३ अर्धशतके)
वर्ष २०१९: २६ सामन्यांमध्ये ५९.८६ च्या सरासरीने १३७७ धावा (५ शतके आणि ७ अर्धशतके)