ENG vs SL, World Cup 2023: विश्वचषकाच्या २५व्या सामन्यात श्रीलंकेसमोर गतविजेत्या इंग्लंडचे आव्हान आहे. उभय संघांमधील हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी चार सामने खेळले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे. आजच्या सामन्यात जो संघ पराभूत होईल त्याचे उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग जवळपास बंद होईल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना हा ‘करो या मरो’ अशा स्वरूपाचा असणार आहे.

आयसीसी विश्वचषक २०२३ सुरू होण्याआधी, ज्या दोन संघांना जेतेपदासाठी सर्वांनी फेव्हरेट मानले होते, त्यांची कहाणी आता वेगळी आहे. २०११च्या विश्वविजेत्या भारताने पहिले पाच सामने जिंकून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे, तर २०१९चा चॅम्पियन इंग्लंड उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.

AUS vs PAK Fans Make Fun Of Mohammad Rizwan As He Holds Pat Cummins' Hand
AUS vs PAK : ‘प्लीज मला हरवू नकोस हां…’, पॅट कमिन्सच्या हातावर हात ठेवल्याने मोहम्मद रिझवान ट्रोल, मीम्सना उधाण
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
The New Zealand team defeated the Indian team in the test match sport news
सपशेल अपयशाची नामुष्की; फिरकीपुढे भारताची पुन्हा दाणादाण
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Five Reasons for India Defeat
IND vs NZ : भारतीय संघावर का ओढवली मायदेशात मालिका पराभवाची नामुष्की?
WTC Points Table Changed After South Africa Test Series Win Over Bangladesh Blow to New Zealand India
WTC Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने WTC च्या गुणतालिकेत बदल, न्यूझीलंड संघाला बसला फटका तर टीम इंडिया टेन्शनमध्ये
IND vs NZ 3rd Test New Zealand opt to bat against India
IND vs NZ : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, भारताने बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला दिली संधी

पहिल्या ४ सामन्यांपैकी ३ गमावल्यानंतर इंग्लंड संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने पुनरागमन करत बांगलादेशचा पराभव केला, मात्र तिसऱ्या सामन्यात त्यांना अफगाणिस्तानकडून ६९ धावांनी धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आणि चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २२९ धावांनी त्यांचा पराभव केला. या दारूण पराभवांमुळे इंग्लंडच्या विश्वचषक मोहिमेला मोठा धक्का बसला आहे, परंतु ते अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत.

इंग्लंड विश्वचषक २०२३ उपांत्य फेरीत कसे पोहोचू शकेल?

इंग्लंडला अजून पाच सामने खेळायचे आहेत आणि हे पाच सामने जिंकून त्यांना विश्वचषकाच्या बाद फेरीत स्थान मिळवण्याची चांगली संधी आहे. जर इंग्लंडने त्यांचे पुढील पाच सामने जिंकले, तर त्यांच्याकडे ६ विजयांसह १२ गुण होतील, ज्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळण्याची हमी मिळणार नाही, परंतु अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याच्या त्यांच्या शक्यता वाढतील. त्यामुळे इंग्लंडचे भवितव्य आता केवळ स्वतःच्या कामगिरीवरच नाही तर इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून असेल. उर्वरित सामने जिंकण्याबरोबरच त्यांची रनरेटवरही नजर असेल, जी उपांत्य फेरी गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. इंग्लंडचा निव्वळ रन रेट हा (-१.२४७) सध्या फक्त बांगलादेश (-१.२५३) आणि नेदरलँड्स (-१.९०२) पेक्षा चांगला आहे.

विश्वचषक २०२३ चे उर्वरित ५ सामने इंग्लंड कधी आणि कोणाविरुद्ध खेळणार?

२६ ऑक्टोबरला इंग्लंडचा सामना माजी चॅम्पियन श्रीलंकेशी बंगळुरू येथे होणार आहे. १९९६च्या विश्वविजेत्या श्रीलंकेची स्थिती देखील इंग्लंडसारखीच आहे, परंतु चांगल्या नेट रन रेटमुळे (-१.०४८) ते गुणतालिकेमध्ये इंग्लंडपेक्षा एक स्थान वर आहेत. इंग्लंडची सर्वात कठीण कसोटी रविवारी लखनऊमध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानवर असलेल्या भारताविरुद्ध आणि ४ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. इंग्लंड ८ नोव्हेंबरला पुण्यात नेदरलँड्सशीही भिडणार आहे आणि ११ नोव्हेंबरला कोलकाता येथे १९९२च्या चॅम्पियन पाकिस्तानशी अंतिम साखळी सामना खेळणार आहे.

इंग्लंडची २०२३ विश्वचषक मोहीम पुन्हा रुळावर येण्याची शक्यता काय आहे?

इंग्लंड याआधी २०१५ विश्वचषकाच्या गट टप्प्यातून बाहेर पडला होता आणि बांगलादेशविरुद्ध धक्कादायक पराभवानंतर पाचव्या स्थानावर होता. यानंतर इंग्लंडने पुनरागमन करत २०१९चा विश्वचषक जिंकला. भारताने आयोजित केलेल्या मागील तीन एकदिवसीय विश्वचषकांपैकी प्रत्येकात इंग्लंड संघ बाद फेरीत पोहोचला होता. इंग्लंड संघ १९८७च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता, तर १९९६ आणि २०११च्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता.

हेही वाचा: ENG vs SL: बेन स्टोक्स दम्याशी झुंजत आहे? इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सराव करताना इनहेलर वापरतानाचा फोटो व्हायरल

इंग्लंडने आजच्या सामन्यात केले तीन बदल

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. संघातील तीन बदलांची माहिती त्यांनी दिली. जखमी रीस टोपलीशिवाय हॅरी ब्रूक आणि गस ऍटिंकसन या सामन्यात खेळत नाहीत. ख्रिस वोक्स, मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोन परतले आहेत. त्याचबरोबर अँजेलो मॅथ्यूज आणि लाहिरू कुमरा यांचे श्रीलंकेच्या संघात पुनरागमन झाले आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश तिक्षणा, कसून राजिथा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.

इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.