A fan’s poster is going viral in which it is written that he misses Virat Kohli: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ३ सामन्याच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना त्रिनिदाद येथे खेळला जात आहे. सध्या ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. अशा प्रकारे अखेरची वनडे जिंकून मालिका जिंकण्यावर दोन्ही संघांच्या नजरा आहेत. मात्र या सामन्यात भारतीय संघ पुन्हा एकदा त्यांचे नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय मैदानात उतरला आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. याआधी तो दुसऱ्या वनडेतही खेळला नव्हता.
चाहते विराट कोहलीला करतायत मिस –
मात्र, भारत-वेस्ट इंडिज तिसऱ्या सामन्यादरम्यान स्टेडियममधील चाहते विराट कोहलीला मिस करत आहेत. वास्तविक, सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टरमध्ये फॅनने लिहिले आहे की, तो विराट कोहलीला मिस करत आहे. मात्र, हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.
इशान किशनचे हे वेस्ट इंडिज दौऱ्यावरील सलग चौथे अर्धशतक आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक आहे. इशानने या मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक ४३ चेंडूत पूर्ण केले. त्याने दुसऱ्या आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यात आणि त्याआधी दुसऱ्या कसोटीतही अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर इशान किशन ६४ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. त्याचबरोबर त्याने एमएस धोनीच्या एका विक्रमाची बरोबर केली.
हेही वाचा – IND vs WI: इशान किशनने रचला इतिहास, सलग तिसरे अर्धशतक झळकावत धोनीच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी
संजू सॅमसनचे अर्धशतक –
संजू सॅमसनने ३९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याचे हे वनडे क्रिकेटमधील तिसरे अर्धशतक आहे. संजू सॅमसन ४१ चेंडूत ५१ धावांची शानदार खेळी करून बाद झाला. रोमारियो शेफर्डने त्याला शिमरॉन हेटमायरकरवी झेलबाद केले. आता कर्णधार हार्दिक पांड्या शुबमन गिलसोबत क्रीजवर आहे. भारताची धावसंख्या ३७ षटकांनंतर ३ बाद २३८ अशी आहे.