BBL Stadium Fire breaks out at Gabba : ऑस्ट्रेलियात सध्या बिग बॅश लीग खेळली जात आहे. या स्पर्धेतील ३६वा सामना ब्रिस्बेन हीट आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात गाबा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ब्रिस्बेन हीट संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून २०१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना हॉबार्ट हरिकेन्सच्या डावाच्या चौथ्या षटकानंतर स्टेडियममध्ये अचानक आग लागली. यानंतर खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून पंचांनी काही काळ सामना थांबवला होता. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

२०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना होबार्ट हरिकेन्स संघाने ४ षटकानंतर बिनबाद ४७ धावा केल्या होत्या. त्यावेळी स्टेडियममध्ये आग लागल्याचे दिसली. ही आग जिथे चाहत्यांच्या मनोरंजनासाठी डीजे लावण्यात आला होता. तिथे लागली होती. यानंतर लगेच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवण्याचे काम केले, ज्यात त्यांनी लवकरच परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आणली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सामना सुरु असताना स्टेडियमध्ये लागली आग –

बीबीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियमच्या एका स्टँडमध्ये लागलेल्या आगीमुळे खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यावेळी सर्व खेळाडू मैदानावर उपस्थित राहिले आणि काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला.

हेही वाचा – Kevin Pietersen : टीम इंडियाचा फलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज उत्सुक, पोस्ट होतेय व्हायरल

बिग बॅश लीग २०२४-२५ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. होबार्ट हरिकेन्सने या सामन्यापूर्वीच प्लेऑफसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. होबार्ट संघाने आतापर्यंत ८ सामने खेळले असून ६ जिंकले आहेत. त्याचबरोबर ब्रिस्बेन हीटला अद्याप प्लेऑफसाठी आपले स्थान निश्चित करता आलेले नाही, त्यामुळे हा सामना जिंकणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Story img Loader