बुद्धिबळ जगज्जेतेपद लढतींच्या १३८ वर्षांच्या इतिहासातील सर्वांत मोठी घोडचूक चीनच्या डिंग लिरेनकडून १२ डिसेंबर रोजी पटावर घडली आणि भारताचा दोम्माराजू गुकेश नाट्यमयरीत्या सर्वांत युवा जगज्जेता बनला. अवघ्या १८व्या वर्षी १८वा जगज्जेता. पुरुष बुद्धिबळ क्षेत्रामध्ये भारत आता महासत्ता बनला आहे हे गुकेशच्या जगज्जेतेपदाने सिद्ध केले. या वर्षी भारताने पुरुष ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्या वाटचालीत आपण चीनचाही पाडाव केला होता हे उल्लेखनीय. त्या लढतीमध्ये लिरेनने गुकेशशी खेळणे टाळले होते, हेही तितकेच दखलपात्र.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाढते वर्चस्व

सध्या २७०० एलो गुणांकनाच्या वर सहा भारतीय बुद्धिबळपटू आहेत. तितक्या संख्येने केवळ अमेरिकेचे ग्रँडमास्टर आहेत. चीनचे चार आणि रशियाचे दोनच. एके काळी भारताचा केवळ विश्वनाथन आनंद ‘क्लब-२७००’मध्ये होता. जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचात दोघे भारतीय (अर्जुन आणि गुकेश) आहेत. भारताच्या टॉप-थ्री व्यतिरिक्त विदिथ गुजराती, अरविंद चिदम्बरम, निहाल सरीन, रौनक साधवानी, मुरली कार्तिकेयन, ल्युक मेन्डोन्सा, एस. एल. नारायणन हे सगळेच चमकू लागले आहेत. यांतील रौनक आणि ल्युक हे १८ वर्षांचे आहेत. तर निहाल २० वर्षांचा. म्हणजे हा ‘पूल’ किती मोठा आहे, यावरून किती काळ भारत वर्चस्व गाजवणार याचा अंदाज बांधता येईल. सोव्हिएत काळात बरेचसे बडे ग्रँडमास्टर वर्चस्वासाठी आपसांत लढायचे. त्यांच्यापेक्षा अधिक निकोप स्पर्धा भारताच्या उच्चतम खेळाडूंमध्ये जगज्जेतेपदासाठी दिसून येऊ शकते.

हेही वाचा : IND vs AUS: विराटने ‘नैनोंं में सपना’ गाण्यावर डान्स करत हरभजनची घेतली फिरकी, अचानक डान्स का करू लागला कोहली? पाहा VIDEO

महिलांच्या बुद्धिबळविश्वात चीन आजही निर्विवाद महासत्ता आहे आणि भारताला त्यांच्या आसपास जाण्यासाठी अजून अवधी आहे. आर. वैशाली, दिव्या देशमुख आणि वंतिका अगरवाल या युवा ब्रिगेडची सध्याची कामगिरी पाहता, तो दिवस फार दूर नाही. पुरुषांमध्ये मात्र ज्या वेगाने भारताची वाटचाल सुरू आहे, ते पाहता पूर्वीच्या सोव्हिएत रशियाच्या वर्चस्वाचे दुसरे मॉडेल या देशात विकसित होते की काय असे वाटावे. एका विख्यात ग्रँडमास्टरने भारताच्या विद्यामान तेजस्वी त्रिमूर्तीची तुलना त्या युगाशी केली. गुकेश, अर्जुन एरिगेसी आणि आर. प्रज्ञानंद हे ते तिघे जण. १९५० आणि १९६०च्या दशकांमध्ये मिखाइल बॉटविनिक, वॅसिली स्माइस्लॉव्ह, मिखाइल ताल, टायग्रिन पेट्रोशियान आणि बोरिस स्पास्की हे आलटून-पालटून जगज्जेते होत राहिले. ही शृंखला मोडली अर्थातच अमेरिकेच्या बॉबी फिशरने. पण अल्पकाळापुरतीच. नंतर पुन्हा एकदा बराच काळ अनातोली कारपॉव, गॅरी कास्पारॉव, व्लादिमीर क्रॅमनिक असे सोव्हिएत-रशियन वर्चस्व कायम राहिले. ती परिस्थिती आता बदलली आहे.

सोव्हिएत-रशियन साम्राज्याला घरघर

रशियन बुद्धिबळपटू आजही चमकत आहेत. सर्गेई कार्याकिन आणि इयन नेपोम्नियाशीसारखे बुद्धिबळपटू आव्हानवीरही ठरले. पण प्रथम आनंद आणि नंतर कार्लसन युगामुळे रशियन वर्चस्वाला घरघर लागली, ती कायमची. विश्वनाथन आनंद या वर्चस्वकालातही अचल राहिला. त्याचे युग कार्सलनने संपवले, तरी आनंदमुळे प्रेरित होऊन जय्यत तयारीनिशी आलेल्या नवीन, ताज्या दमाच्या भारतीय बुद्धिबळपटूंविरुद्ध किती काळ तग धरता येईल, याविषयी कार्लसनही साशंक आहे. आजच्या युगात नवीन प्रतिभावान बुद्धिबळपटू भारत, चीन, उझबेकिस्तान, तुर्कीये, इराण येथून अधिक सातत्याने येत आहेत. अमेरिकेची सध्याची ताकद ही प्राधान्याने स्थलांतरित बुद्धिबळपटूंमुळे दिसून येते. खुद्द अमेरिकी भूमीतून युवा प्रतिभावान ग्रँडमास्टर इतक्या सातत्याने निर्माण होत नाहीत. तेथेही चिनी आणि भारतीय स्थलांतरितांची उपस्थिती ठळकपणे दिसून येते.

आनंदमुळे भारतात बुद्धिबळाविषयी आदर, आत्मीयता, उत्सुकतेची जी लाट निर्माण झाली, तितकी ती कार्लसनमुळे त्याच्या देशात किंवा युरोपात निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे कार्लसनचा उदय आणि वर्चस्व हे निर्विवाद असले, तरी ते बरेचसे ‘अपघाती’ ठरते. रशियाच्या आणि आनंदच्या ओसरत्या वर्चस्वातून निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा कार्लसनने पुरेपूर उचलला. आता कार्लसनच्या माघारीने निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा चिनी आणि भारतीय बुद्धिबळपटूंनी घेतला, हा योगायोग नाही. चीन आता या शर्यतीत बराच मागे पडला आहे. गेल्या काही वर्षांत कार्लसनला सर्व प्रकारांमध्ये मात देणाऱ्यांमध्ये भारतीय बुद्धिबळपटूंची संख्या लक्षणीय ठरते. कार्लसनला ही धोक्याची घंटा वाटली असावी काय?

हेही वाचा : IND vs AUS: ‘स्विंग होत नाहीय…’, बुमराह गाबा कसोटीच्या पहिल्या दिवशी वैतागला; रोहित शर्माचा नाणेफेकीचा निर्णय चुकला? पाहा VIDEO

गुकेश, लिरेनविषयी आकस?

ही चर्चा लिरेन-गुकेश लढतीच्या कथित निम्न दर्जापाशी आणावीच लागेल. कार्लसन, कास्पारॉव आणि क्रॅमनिक या तिघा माजी जगज्जेत्यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर जगज्जेतेपदाची खुमारी या लढतीला नाही अशी टिप्पणी केली. या तिघांच्या मताचा आदर करावा लागेल. पण यांच्या आडून एक मोठा वर्ग लिरेन आणि गुकेश या दोघांच्या जगज्जेतेपदांविषयी किंतु उपस्थित करत असतो. त्यांच्यापेक्षा प्रतिभावान बुद्धिबळपटू भरपूर आहेत आणि त्यांना संधी मिळाली नाही असा यांचा साधारण सूर. लिरेन आणि गुकेश यांनी कँडिडेट्ससाठी पात्रता निकष, प्रत्यक्ष कँडिडेट्स लढत असे दोन खडतर टप्पे पार पाडले हे नाकारता कसे येईल? डिंग लिरेन भरात होता, त्यावेळी कार्लसनलाही तो जड जायचा. जवळपास कुणाशीही हरायचाच नाही. कार्लसनला एका जगज्जेतेपद लढतीत जेरीस आणलेल्या नेपोम्नियाशीला त्याने गतवर्षी हरवले. त्याच लिरेनला आता गुकेशने हरवले. तरीदेखील दोघांचे यश पचवणे ज्यांना जड जाते, त्यांना रशिया किंवा युरोपव्यतिरिक्त इतरांचे वर्चस्व सोसत नाही. हा वर्ग कोणता हे ज्याचे-त्याने ठरवावे.

हेही वाचा : IND vs AUS: गाबा कसोटीच्या अखेरच्या ४ दिवसांची वेळ बदलली, सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

काय व्हायला हवे?

सोव्हिएत वर्चस्वाचे प्रारूप भारतात दिसून येत आहे. या खेळाला आणि खेळाडूंना अनेक राज्यांमध्ये घसघशीत सरकारी पाठबळ मिळत आहे. टाटा आणि महिंद्रा असे दोन बडे उद्याोगसमूह जगातील सर्वांत महत्त्वाच्या स्पर्धा भरवू लागले आहेत. इतरही उद्याोगांनी बुद्धिबळपटूंना सदिच्छादूत बनवण्याचा नवीन स्वागतार्ह पायंडा पाडला आहे. सोव्हिएत वर्चस्वयुगाची आठवण करून देणारी ही घुसळण असली, तरी त्या कालपटाच्या काळ्या बाजूचे विस्मरण होऊ नये ही अपेक्षा. वाट्टेल त्या किमतीत वर्चस्व राखण्याच्या अट्टहासापायीच बॉबी फिशरसारखा एखादा संपूर्ण सोव्हिएत व्यवस्थेची फजिती करून गेला. ‘सोव्हिएत स्कूल ऑफ चेस’ ही आदर्श व्यवस्था होती आणि त्यातून अनेक रत्ने निपजली. पण त्याच व्यवस्थेच्या पोलादी पडद्याने हा खेळ बंदिस्त करण्याची चूक केली. ती कशी उलटली हे दिसतेच आहे. या खेळाला बऱ्याच प्रमाणात प्रेक्षकाभिमुख आणि धनसक्षम करण्याचे श्रेय पश्चिम युरोप आणि आता भारताला द्यावे लागेल. पण हा पुढाकार धनदांडग्या मनोवृत्तीत होणार नाही हे पाहावे लागेल. वर्चस्व राखण्याचा भारतीय अट्टहास क्रिकेटमध्येच दिसतोच आहे. तसे बुद्धिबळात घडणे हितकारक नाही.

siddharth. khandekar @expressindia. com