बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना नागपुरात खेळला जात आहे. आज या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या दिवशी शतक झळकावून भारतीय संघाची बाजू एक भक्कम केली आहे. दरम्यान माजी कर्णधार विराट कोहलीने निराशा केले. तरी देखील चाहत्यांचे विराटवरील प्रेम काय कमी होत नाही. कारण विराटच्या नावाच्या एका पोस्टरने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे.
विराट कोहली हा जगातील सर्वात प्रिय खेळाडूंपैकी एक आहे. शुक्रवारी, १० फेब्रुवारी रोजी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध नागपूर कसोटीच्या २ दिवसादरम्यान एका चाहत्याने या दिग्गज फलंदाजावर आपले प्रेम व्यक्त केले. पहिल्या सत्रात चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला. तो भारताचा कर्णधार रोहित शर्मासोबत क्रीझवर फलंदाजीला उभा राहताच एक पोस्ट स्टेडियमध्ये झळकले.
एका चाहत्याने विराट कोहलीच्याबाबतीत त्याचे असलेले प्रेम व्यक्त केले. त्याने हातातील पोस्टवर लिहले होते की, ‘मी विराट कोहलीवर स्वत:च्या बायकोपेक्षा जास्त प्रेम करतो.’ आता या चाहत्यांचा आणि त्याच्या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या १२ धावा करून विराट कोहली बाद झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विराट कोहली अत्यंत साधारण चेंडूवर बाद झाला. विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर टॉड मर्फीने बाद केले. मर्फीचा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता आणि विराटने तो फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने चेंडूने त्याच्या बॅटची कड घेतली आणि चेंडू अॅलेक्स कॅरीच्या ग्लोव्हजमध्ये गेला.
हेही वाचा – IND vs AUS: कसोटी मालिकेदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का; जसप्रीत बुमराहबद्दल आली मोठी अपडेट
विराटच्या कसोटी शतकाचा दुष्काळ कायम!
विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमध्ये खराब कामगिरी सुरूच आहे. या खेळाडूला गेल्या दोन वर्षांत १७ कसोटी सामन्यांमध्ये केवळ 26 च्या सरासरीने केवळ ७३० धावा करता आल्या आहेत. यादरम्यान विराटच्या बॅटमधून एकही शतक झळकले नाही. रोहितने २०१९ साली शेवटचे कसोटी शतक झळकावले. विराटने गेल्या दोन वर्षांत अत्यंत खराब शॉट्स खेळून विकेट गमावल्या आहेत. विराटने एकदिवसीय आणि टी-२० मध्ये केल्याप्रमाणे कसोटीतही धावांचा पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे.