R Ashwin’s warning to Marco Jansen : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रविचंद्रन अश्विनने फलंदाजीत आणि गोलंदाजीत कोणतेही विशेष योगदान दिले नाही, परंतु नियमांबाबतच्या सतर्कतेमुळे तो चर्चेत राहिला. सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रविचंद्रन अश्विनने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को जॅन्सेनला मांकडिग करण्याचा इशारा दिला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गुरुवारी सुपरस्पोर्ट पार्कमध्ये पहिल्या सत्रात अश्विनने चेंडू टाकण्यापूर्वी जॅन्सनने आपले क्रीज सोडून खूप दूर जात होता. अशा स्थितीत अश्विनने त्याला इशारा दिला आणि जॅन्सनने यानंतर असा प्रयत्न केला नाही. आर आश्विन दक्षिण आफ्रिकेच्या डावातील ९८ व्या षटकातील चेंडू टाकताना अचानक थांबला. त्यानंतर नॉन-स्ट्रायकर एंडला असलेल्या मार्को जॅन्सेनला चेंडू टाकण्यापूर्वी क्रीझ न सोडण्याचा इशारा दिला. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

AUS vs PAK Fans Make Fun Of Mohammad Rizwan As He Holds Pat Cummins' Hand
AUS vs PAK : ‘प्लीज मला हरवू नकोस हां…’, पॅट कमिन्सच्या हातावर हात ठेवल्याने मोहम्मद रिझवान ट्रोल, मीम्सना उधाण
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार…
AUS vs PAK Pat Cummins responding to Kamran Akmal mockery of the Australian team
AUS vs PAK : कामरान अकमलला ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली उडवणे पडले महागात; पॅट कमिन्सने दिले चोख प्रत्युत्तर, VIDEO व्हायरल
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
Rohit Sharma Statement on India Series Defeat IND vs NZ Said I wasnt at my best with both bat and as a captain
IND vs NZ: “एक कर्णधार व फलंदाज म्हणून मी…”, भारताच्या दारूण पराभवानंतर रोहित शर्माचं भावुक वक्तव्य; व्हाईट वॉशचं खापर कोणावर फोडलं?
IND vs NZ India broke the embarrassing record of 50 years ago
IND vs NZ : भारताचा ५० वर्षांनंतर मायदेशात पहिल्यादांच नकोसा विक्रम, काय आहे ही नामुष्की? जाणून घ्या

पहिल्या डावात जॅन्सनने दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि डीन एल्गरला साथ दिली. जो आपले पहिले द्विशतक झळकावण्यापासून अवघ्या १५ धावा दूर राहिला. मात्र, त्याला साथ देताना जॅन्सेनने ८४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. २०१९ मधील आयपीएल सामन्यात जोस बटलरला मांकडिग पद्धतीने धावबाद केल्यामुळे अश्विनवर टीका झाली होती. तथापि, त्याने मांकडिग पद्धतीचे समर्थन करणे सुरू ठेवले आहे, ज्याबद्दल भूतकाळात खूप चर्चा झाली आहे.

हेही वाचा – Year Ender 2023 : यंदा टीम इंडियात ‘या’ १६ खेळाडूंनी केले पदार्पण, जाणून घ्या कोणकोणत्या खेळाडूंचा आहे समावेश

आर अश्विनने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आपल्या विकेटसाठी खूप मेहनत घेतली, पण त्याला फारसे यश मिळाले नाहीत. केएल राहुलने एकदा मार्को जॅन्सनला जीवदान दिले. ९८व्या षटकात शुबमन गिलने जेराल्ड कोएत्झीचा झेल सोडला. अखेर आपल्या १८व्या षटकात कोएत्झीची विकेट घेण्यात अश्विनला यश मिळाले, जो ऑफस्पिनर मोहम्मद सिराजच्या हाती झेलबाद झाला.

हेही वाचा – IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेपूर्वी मोठी घोषणा, ‘या’ सामन्याची तिकिटे मिळणार फक्त ‘इतक्या’ रुपयात

आर अश्विन ५०० कसोटी विकेट्स पूर्ण करण्याच्या जवळ असून ऑफ-स्पिनरला आशा आहे की त्याचे सहकारी त्याला तिथे लवकर पोहोचण्यास मदत करतील. रवींद्र जडेजाच्या जागी ऑफस्पिनरची निवड करण्यात आली होती, ज्याला कसोटीच्या पहिल्या दिवशी सकाळी मानेचा त्रास होता. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४०८ धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या आधारे १४८ धावांची आघाडी घेतली आहे.