A photo of Virat Kohli being hugged by a fan : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ६ विकेट्सनी पराभव केला. त्याचबरोबर मालिकेत २-० ने अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांनी अर्धशतकं झळकावत विजयात मोलाचे योगदान दिले. दरम्यान या सामन्यातील विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विराट कोहली १४ महिन्यांनंतर अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातून भारतीय टी-२० संघात पुनरागमन केले. या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजीदरम्यान, विराट कोहली सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना, एका चाहत्याला सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन मैदानात पोहोचण्यात यश आले. मैदानात उतरताच तो कोहलीकडे धावत गेला आणि त्याला मिठी मारली, या घटनेचा फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे
Vivek Oberoi
“मला अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन यायचे”, बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणाला, “माझ्या रिलेशनशिपच्या…”

यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबेने झळकावली अर्धशतकं –

टीम इंडियाकडून यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांनी अर्धशतकी खेळी साकारली. यशस्वीने सर्वाधिक ६८ धावा केल्या. तर शिवम दुबेने नाबाद ६३ धावा केल्या. त्याने ३२ चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि चार षटकार मारले. शिवमचा स्ट्राईक रेट १९६.८८ होता.

हेही वाचा – IND vs AFG 2nd T20 : टीम इंडिया मालिका जिंकण्यात ‘यशस्वी’! शिवम-जैस्वालने झळकावली वादळी अर्धशतकं

विराट कोहलीने १४ महिन्यानंतर टी-२० क्रिकेटमध्ये केले पुनरागमन –

विराट कोहली १४ महिन्यांनंतर परतला आहे. त्याने १६ चेंडूचा सामना करताना २९ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट १८१.२५ होता. रोहित शर्मा आणि जितेश शर्मा यांना खातेही उघडता आले नाही. रिंकू सिंगने नाबाद नऊ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून करीम जनातने दोन गडी बाद केले. फजलहक फारुकी आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs AFG 2nd T20 : रोहित शर्माने रचला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला पुरुष क्रिकेटपटू

अर्शदीपने सिंगने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट्स –

अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायबने सर्वाधिक ५७ धावा केल्या. नजीबुल्ला झाद्रानने २३, मुजीब उर रहमानने २१ आणि करीम जनातने २० धावांचे योगदान दिले. रहमानउल्ला गुरबाज आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी १४ धावा केल्या. कर्णधार इब्राहिम झाद्रान आठ धावा करून बाद झाला, तर अजमतुल्ला ओमरझाई दोन धावा करून बाद झाला. नूर अहमदने एक धाव घेतली. नवीन उल हक एक धाव घेत नाबाद राहिला. फजलहक फारुकीला खातेही उघडता आले नाही. अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. शिवम दुबेने एक विकेट घेतली.

Story img Loader