Arshin Kulkarni Century: महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये (एमपीएल) अर्शीन कुलकर्णीने आपल्या बॅटने तुफान खेळी केली आहे. एमपीएल २०२३च्या सातव्या सामन्यात पुणेरी बाप्पा आणि ईगल नाशिक टायटन्स हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात कुलकर्णीने षटकारांचा पाऊस पाडत सर्वात वेगवान शतक ठोकले. त्याने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने या लीगमध्ये इतिहासच रचला नाही तर आपल्या संघाला विजय मिळवून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली.
सध्या खेळल्या जात असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये १८ वर्षीय अष्टपैलू अर्शीन कुलकर्णीने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे. अर्शीन कुलकर्णी लीगमध्ये ईगल नाशिक टायटन्सकडून खेळत आहे. त्याने एकाच सामन्यात धडाकेबाज शतक झळकावले, गोलंदाजीत एकूण ४ विकेट्सही घेतल्या. या अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडूचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोलंदाजीत वेगवान गोलंदाज अर्शीन कुलकर्णीने चार फलंदाजांना बाद केले. पुणेरीला विजयासाठी शेवटच्या षटकात ६ धावांची गरज होती. हा ओव्हर बॉल अर्शीनच्या हातात होता. त्याने केवळ ४ धावा दिल्या आणि दोन फलंदाजांना बाद करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अर्शीनने ४ षटकात केवळ २१ धावा दिल्या. या सामन्यात दोन्ही संघांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोलंदाजाची इकोनॉमी ७ पेक्षा कमी नव्हती. या सामन्यात नाशिकने प्रथम फलंदाजी करताना २०२३ धावा केल्या. ऋतुराज गायकवाडच्या पुणेरी बाप्पा संघाला ८ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ २०२ धावाच करता आल्या. ईगल्सने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. आणि बाप्पाचा हा पहिलाच पराभव होता.
फक्त १३ चेंडूत ठोकल्या ९० धावा
नाशिक टायटन्सकडून खेळताना अर्शीन कुलकर्णीच्या फलंदाजी पाहून सर्वानीच धमाल केली. अर्शीनने केवळ ५४ चेंडूत ११७ धावांची स्फोटक खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त तीन चौकार आले, पण या १८ वर्षीय फलंदाजाने १३ षटकार ठोकले. म्हणजेच अर्शीनने केवळ चौकार आणि षटकारांसह ११७ धावांच्या तुफानी खेळीत ९० धावा केल्या. अर्शीन कुलकर्णीच्या फलंदाजीचा स्ट्राईक रेट २१६ पेक्षा जास्त होता. या धमाकेदार खेळीदरम्यान त्याने अवघ्या ४६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अशा प्रकारे तो महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला.
देशांतर्गत सामन्यांमध्येही शानदार कामगिरी केली आहे
अर्शीन कुलकर्णी तुफानी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो विनू मांकड ट्रॉफी २०२२ मध्ये महाराष्ट्राकडून खेळताना २६८ सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. यामध्ये दोन शतकी खेळींचा समावेश होता. कूचबिहार ट्रॉफीमध्येही तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्येही त्याने ३ सामन्यात १९५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीतही त्याने ६.८९च्या इकॉनॉमीसह धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.