ICC World Cup 2023: आयसीसीने एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या पहिल्या सामन्यासाठी अंपायर्सची नावे जाहीर केली आहेत. भारताचे नितीन मेनन आणि कुमार धर्मसेना ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार्‍या विश्वचषकातील सलामीच्या सामन्याची ही जबाबदारी पार पाडतील, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी सांगितले. माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ या सामन्यासाठी सामनाधिकारी असतील. अहमदाबाद येथे खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पॉल विल्सन टीव्ही अंपायर तर सैकत हे चौथे अंपायर असतील. आयसीसीच्या एमिरेट्स एलिट पॅनेलमधील सर्व १२ अंपायर्स असतीलच त्याशिवाय, आयसीसीच्या उदयोन्मुख अंपायर्स पॅनेलचे देखील चार सदस्य असणार आहेत. त्यामुळे एकूण १६ अंपायर्स विश्वचषक स्पर्धेच्या १३व्या आवृत्तीत काम पाहतील.

अंपायर्सच्या या यादीत लॉर्ड्स येथे २०१९च्या अंतिम सामन्यासाठी नियुक्त केलेल्या चार अंपायर्सपैकी तीन अंपायर्सचा समावेश आहे. त्यात कुमार धर्मसेना, मरायस इरास्मस आणि रॉड टकर ही नावे आहेत. या यादीतील एकमेव गायब झालेले नाव म्हणजे अलीम दार आहे, ज्यांनी यावर्षी मार्चमध्ये एलिट पॅनेलचा राजीनामा दिला होता.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव

हेही वाचा: Harbhajan Singh: ‘भारत पाकिस्तानशी खेळताना घाबरतो’ या विधानावर हरभजन नजम सेठींवर भडकला; म्हणाले, “हे आजकाल कोणती नशा…”

माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेफ क्रो, अँडी पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डसन आणि श्रीनाथ यांचा सामनाधिकारी (रेफरी) म्हणून वन डे विश्वचषक २०२३साठी आयसीसी एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. लीग टप्प्यातील सर्व सामन्यांसाठी या अधिकार्‍यांचे नामांकन करण्यात आले असून, स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी आणि अंतिम फेरीसाठी योग्य वेळी त्यांची निवड केली जाईल आणि याबाबत नावे जाहीर केले जातील.

आयसीसीचे महाव्यवस्थापक वसीम खान म्हणाले, “या अशा प्रकारच्या स्पर्धेसाठी तुम्हाला प्रत्येक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची गरज असते. अंपायर्स, रेफरी आणि या दोघांचा एक उदयोन्मुख गट हा तयार करावाच लागतो. या विश्वचषकासाठी निवडलेल्या आयसीसी एलिट पॅनेलमधील सदस्यांकडे अफाट कौशल्य, अनुभव आणि जागतिक दर्जाचे मानके आहेत. आम्ही या स्पर्धेसाठी बनवलेल्या गटाबद्दल आनंदी आहोत. ही स्पर्धा कुठल्याही वादाशिवाय निर्विघ्नपणे पार पडेल, यात मला कुठलीही शंका नाही.”

हेही वाचा: Ben Stokes: बेन स्टोक्सशिवाय इंग्लंड भारत दौरा करणार का? इंग्लिश कर्णधाराकडून आले मोठे अपडेट; म्हणाला, “मला नाही वाटत…”

विश्वचषक स्पर्धेसाठी अंपायर्सची यादी: ख्रिस ब्राउन, कुमार धर्मसेना, मरायस इरास्मस, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, नितीन मेनन, अहसान रझा, पॉल रीफेल, शराफुद्दौला इब्न शैद, रॉड टकर, अॅलेक्स वॉर्फ जोएल विल्सन आणि पॉल विल्सन.