Fan Gifted Bracelet To Virat Kohli: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोस येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला . खरंतर, विराट कोहली आणि रोहित शर्मा या सामन्यात भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हते. मात्र विराट कोहलीचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विराट कोहलीने बार्बाडोसमध्ये चाहत्यांची भेट घेतली.

भारतीय फलंदाज विराट कोहली मैदानावर जितका आक्रमक आहे तितकाच तो मैदानाबाहेरही शांत आणि संयमी आहे. विराट कोहलीही त्याच्या चाहत्यांवर प्रेम करतो आणि त्यांच्या भावनांची पूर्ण काळजी घेतो. शनिवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीला एका छोट्या चाहतींने एक खास भेटवस्तू दिली, जी विराट कोहलीने मनापासून स्वीकारली.

Rohit Sharma Gives Update on Virat Kohli Knee Injury on Toss of IND vs ENG 1st ODI
IND vs ENG: विराट कोहली पहिल्या वनडेत का नाही? रोहित शर्माने दिले अपडेट
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Virat Kohli Gives Bats and Kit Bags as Gifts to Delhi Domestic Players on Ranji Trophy Return
Virat Kohli: विराट कोहलीने जिंकली सर्वांची मनं, दिल्लीच्या खेळाडूंना रणजीदरम्यान भेट दिल्या खास गोष्टी
Ranji Trophy 2025 Virat Kohli security 3 fan reached on ground during fielding at Arun Jaitley Stadium Delhi
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; रणजी लढतीदरम्यान तीन चाहते घुसले मैदानात
Who Is Himanshu Sangwan He Clean Bowled Virat Kohli on Ranji Trophy Return
Ranji Trophy: विराट कोहलीला क्लीन बोल्ड करणारा हिमांशू सांगवान आहे तरी कोण? सेहवागचा आहे शेजारी
Virat Kohli Clean Bowled on Ranji Trophy Return
Virat Kohli Ranji Trophy: विराट कोहलीच्या पदरी रणजीतही निराशा! स्टंप्सच्या कोलांटउड्या, पाहा VIDEO
Ranji Trophy 2025 fan entered at Arun Jaitley Stadium ground to meet Virat Kohli during Delhi vs Railway match
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहत्याने भेदला सुरक्षा रक्षकांचा घेरा, VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli returns to Ranji Trophy cricket sport news
कोहलीला सूर गवसणार? रणजी करंडकात आज १२ वर्षांनी

विराट कोहलीला मिळाली खास भेटवस्तू –

बीसीसीआयने रविवाकी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा चाहत्यांना भेटताना दिसत होते. जेव्हा कोहली स्टँडजवळ पोहोचला तेव्हा एका मुलीने त्याला सांगितले की, तिने त्याच्यासाठी ब्रेसलेट आणले आहे. हे ब्रेसलेट मुलीने स्वतः बनवले होते. कोहलीने ब्रेसलेट घेऊन हातावर घातले. यानंतर त्याने बाकीच्या चाहत्यांसोबत सेल्फीही काढले.

हेही वाचा – IPL 2024 चा हंगाम विदेशात होणार? जाणून घ्या काय आहे कारण

कोहलीने चाहतीच्या वडिलांचे जिंकले मन –

मुलीचे वडील बोलले आणि म्हणाले की, कोहलीने येऊन आपल्या मुलीची भेटवस्तू स्वीकारल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. कोहलीचा औदार्य पाहून त्याला आश्चर्य वाटले. कोहलीशिवाय रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनीही चाहत्यांसोबत वेळ घालवला. या घटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Stuart Broad: ”तो दिवस खरोखर खूप…”; युवराज सिंगने मारलेल्या सलग ६ षटकारांवर स्टुअर्ट ब्रॉडने दिली प्रतिक्रिया

सामन्याबद्धल बोलायचे, तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कॅरेबियन संघाने सहा गडी राखून जिंकला. या विजयासह वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४०.५ षटकांत सर्व १० गडी गमावून १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने ३६.४ षटकांत चार गडी गमावून १८२ धावा केल्या आणि सामना सहा गडी राखून जिंकला. या पराभवानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे.

Story img Loader