Rashtravadi Chashak Lohgaon: अनेक वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आणि स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये खूप विचित्र क्षण पाहिला मिळतात. पण अनेक वेळा स्तब्ध होण्यासोबतच हशाही निघेल असेल क्षण दिसतात. सध्या एका स्थानिक क्रिकेट सामन्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या ओठांवर हसू येईल. खरं तर, नॉन-स्ट्रायकरच्या एंडवर धावबाद झाल्यानंतर एका खेळाडूचा संयम सुटला आणि रागाच्या भरात त्याने मैदानावर आपली बॅट फोडली.
हा व्हिडिओ राष्ट्रवादी चषक लोहगाव २०१८ स्पर्धेतील आहे. ज्यामध्ये शिवशंभो स्पोर्ट्स आणि दादाची वस्ती संघ आमनेसामने होते. या सामन्यातील शिवशंभो स्पोर्ट्स संघाच्या आठव्या षटकातील घटनेचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फिरकीपटू गोलंदाजीसाठी तयार असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर स्ट्राईकवर असलेला फलंदाज शॉट खेळण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. पण नंतर गोलंदाज अचानक आपला विचार बदलतो आणि चेंडू फेकण्याऐवजी स्टंपचे बेल्स उडवतो.
रागाच्या भरात फलंदाजाने केला बॅटचा चुरा –
गोलंदाज नॉन-स्ट्रायकर एंडच्या खेळाडूसाठी धावबादची अपील करतो, ती अपील अंपायर लगेच स्वीकारतो आणि बाद घोषित करतो. यानंतर, धावबाद झालेला फलंदाज आपला संयम गमावतो. ज्यानंतर तो अंपायरच्या बाजूलाच खाली बसतो. त्यानंतर आपली बॅट रागारागाने आपटू लागतो. दरम्यान काही क्षणात बॅटचे तुकडे होतात.
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स आपापल्या शैलीत प्रतिक्रिया देत आहेत. जिथे अनेकांनी नियमानुसार खेळाडू बाद झाल्याचे सांगितले, तर अनेकांनी असे होऊ नये असे सांगितले. त्याचबरोबर अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या. एका यूजरने लिहिले की, “जेव्हा माझा दिवस वाईट असतो तेव्हा माझ्यासोबत असे घडते.” दुसऱ्या यूजरने कमेंट केली, “हा सर्वात वाईट नियम आहे. गोलंदाजानेही गोलंदाजी केली नाही, तर त्याला आऊट कसे देणार?