Kid Injured by Andre Russell’s Six in MLC 2023: वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू आंद्रे रसेल सध्या अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये लॉस एंजेलिस नाइट रायडर्सकडून खेळत आहे. या स्पर्धेतील नववा सामना लॉस एंजेलिस नाइट रायडर्स विरुद्ध वॉशिंग्टन फ्रीडमशी झाला. या सामन्यात रसेलने ३७ चेंडूत ७० धावांची स्फोटक खेळी खेळली. या खेळी दरम्यान आंद्रे रसेलचा एक षटकार प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका लहान मुलाच्या डोक्यावर आदळला. आता या घटनेचा व्हिडीओ लॉस एंजेलिस नाइट रायडर्सने शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंद्रे रसेलच्या संघाने हा सामना ६ विकेट्सने गमावला –

आंद्रे रसेलने १८९.१९ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना आपल्या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकार मारले. रसेलची खेळी मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. प्रथम फलंदाजी करताना नाइट रायडर्सने वॉशिंग्टनला १७६ धावांचे लक्ष्य दिले. वॉशिंग्टनने १९ व्या षटकात ४ विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. वॉशिंग्टन फ्रीडमने हा सामना ६ गडी राखून जिंकला.

रसेलच्या षटकाराने जखमी लहान मुलगा –

सामन्यादरम्यान आंद्रे रसेल फलंदाजी करत असताना मैदानावर एक घटना घडली. या कॅरेबियन फलंदाजाने मारलेल्या षटकाराचा एक चेंडू प्रेक्षकांमधील एका लहान मुलाला लागला. या घटनेचा व्हिडीओ लॉस एंजेलिस नाईट रायडर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की रसेलने मारलेला षटकार एका मुलाच्या डोक्यावर आदळला, मात्र या मुलाल कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. सामना संपल्यानंतर रसेलने त्या मुलाची भेट केली आणि विचारपूस केली.

हेही वाचा – Zifro T10 2023: मोहम्मद हाफीजने रचला इतिहास! अवघ्या दोन षटकांत केला ‘हा’ मोठा पराक्रम

आंद्रे रसेलने मुलासोबत काढला फोटो –

सामना संपल्यानंतर आंद्रेने चेंडू लागलेल्या मुलाला मैदानावर बोलावून त्याची प्रकृती जाणून घेतली. त्याने रसेलने मुलाच्या डोक्याचे चुंबन घेतले. त्यानंतर काही वेळ मुलाशी संवाद साधला. यादरम्यान रसेलने मुलाला ऑटोग्राफ दिला आणि त्याच्यासोबत फोटोही क्लिक केला. तसेच रसेलने मुलाला गंमतीने सांगितले की, पुढच्या वेळी तू मॅच बघायला येशील तेव्हा हेल्मेट घालून ये. रसेलच्या या औदार्याने लोकांची मने जिंकली.

आंद्रे रसेलच्या संघाने सलग चौथा सामना गमावला –

आंद्रे रसेल सध्या मेजर क्रिकेट लीगमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्धच्या सामन्यात रसेल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या खेळीत रसेलने ६ षटकार ठोकले. रसेलचा संघ स्पर्धेतील सलग चौथा सामना हरला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video of a young boy sitting in the audience being injured by a six hit by andre russell in mlc 2023 vbm