महेंद्रसिंग धोनी अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार, स्फोटक फलंदाज, सर्वोत्कृष्ट फिनिशर यासोबतच तो अप्रतिम यष्टिरक्षक म्हणून ओळखला जातो.तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी यष्टिरक्षकाची भूमिका निभावतो. अशात नेपाळ टी-२० लीग २०२२ मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून प्रत्येकाला एमएस धोनीची आठवण होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सुरू असलेल्या नेपाळ टी-२० लीग २०२२ क्रिकेटमध्ये, एका यष्टीरक्षकाने त्याच्या अप्रतिम विकेटकीपिंग केली आहे. त्याने एका सामन्यात दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जे पाहून सर्व चाहते त्याच्या क्षेत्ररक्षणाच्या प्रेमात पडले आहेत. तसेच त्याची तुलना एमएस धोनीशी करु लागले आहेत.

एमएस धोनीकडे एक यशस्वी कर्णधार आणि वेगवान यष्टीरक्षक म्हणून पाहिले जाते, जो जलद स्टंपिंग करतो. धोनीने जेव्हा क्षेत्ररक्षकाने चांगला थ्रो टाकला नसताना, ही आपल्या अदभूत कौशल्याने खेळाडूंना धावबाद केले आहे. आता नेपाळ क्रिकेट लीगमध्ये असा एक व्हिडिओ समोर आला आहे

ज्यामध्ये एका यष्टीरक्षकाने यष्टीपासून चेंडू दूर पकडला आणि न पाहता चेंडू यष्टीच्या दिशेने फेकला. मग काय, चेंडू थेट यष्टीला लागला. ज्यामुळे फलंदाज डायव्ह मारुनही वाचू शकला नाही. ज्यामुळे त्याला तंबूचा रस्ता पकडावा लागला.

अशा प्रकारे अर्जुन सौदने एक नव्हे तर दोन खेळाडूंना तंबूत पाठवले. त्याचे यष्टीरक्षण पाहून सर्व चाहत्यांना एमएस धोनीची आठवण झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सर्वजण त्याच्या यष्टीरक्षणाचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा – IPL 2023: मुंबई इंडियन्सने नवीन सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षकाला केले नियुक्त; ‘या’ अनुभवी खेळाडूला मिळाली संधी

महेंद्रसिंग धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला एकदिवसीय विश्वचषक आणि टी-२० विश्वचषक जिंकून दिले. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली अनेक संस्मरणीय मालिका जिंकल्या आहेत. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या नेतृत्वाखाली ४ वेळा विजेतेपद पटकावले आहे.