David Warner gifting a helmet and gloves to a child : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धची तीन सामन्यांच्या कसोटी मालिका ३-० ने जिंकली. सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत कांगारू संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसाठी हा सामना खूप खास होता. खरे तर हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. वॉर्नरने त्याच्या शेवटच्या कसोटी डावात अप्रतिम अर्धशतक झळकावले. पॅव्हेलियनमध्ये जाताना त्याने आपले हेल्मेट आणि ग्लोव्ह्ज एका मुलाला भेट दिले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डेव्हिड वॉर्नरने कसोटी कारकिर्दीतील शेवटच्या डावात अप्रतिम फलंदाजी केली. त्याने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानविरुद्ध ७५ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. अखेरच्या कसोटी डावात त्याला साजिन खानने बाद केले. वॉर्नर आऊट होताच सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर उपस्थित खेळाडूंसह चाहत्यांनीही उभे राहून त्याचे कौतुक केले. पॅव्हेलियनमध्ये परतताना डेव्हिड वॉर्नरने त्याचे हेल्मेट आणि ग्लोव्ह्ज एका मुलाला भेट दिले.
क्रिकेट डॉट कॉम एयूने डेव्हिड वॉर्नच्या बाद झाल्यापासून तो ड्रेसिंग रूममध्ये जाईपर्यंतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एका मुलाला त्याचे हेल्मेट आणि ग्लोव्ह्ज देताना दिसत होता .डेव्हिड वॉर्नरची ही कृती पाहून चाहते खूप खूश झाले आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे खूप कौतुक करत आहेत. शेवटच्या कसोटीनंतर वॉर्नरकडून हेल्मेट आणि ग्लोव्ह्ज मिळाल्यानंतर हा छोटा चाहता खूप आनंदी दिसत होता. त्याच्या आवडत्या फलंदाजाने त्याला हेल्मेट आणि ग्लोव्ह्ज भेट दिले, यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.
हेही वाचा – Ambati Rayudu : राजकीय खेळपट्टीवर अंबाती रायुडू दोन आठवडेही टिकला नाही, वायएसआर काँग्रेसला रामराम
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान डेव्हिड वॉर्नरनेही एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता तो ऑस्ट्रेलियन संघाकडून फक्त टी-२० खेळताना दिसणार आहे. वॉर्नर हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील दिग्गज सलामीवीरांपैकी एक आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक मॅचविनिंग इनिंग्स खेळल्या आहेत.