महेंद्रसिंग धोनी सध्या दुबईमध्ये आहे. जिथे त्याने एका बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. आता दुबईहून धोनीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, जो त्याची पत्नी साक्षी रावत धोनीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. धोनी हार्दिक पांड्यासोबत गायक बादशाहच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साक्षी धोनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, एमएस धोनी सहकारी क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्यासोबत बादशाहच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सगळे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत आणि बादशाह गात असलेल्या गाण्यावर थिरकत आहेत.

साक्षीनेही काही दिवसांपूर्वी (१९ नोव्हेंबर) तिचा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर साक्षी तिच्या पतीसोबत (महेंद्रसिंग धोनी) दुबईला पोहोचली. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून खेळत होता. हार्दिक पांड्या २३ नोव्हेंबरला न्यूझीलंडहून मुंबईत त्याच्या घरी परतला होता. त्यानंतर हार्दिक पांड्यासोबत त्याचा भाऊ कृणाल पांड्याही दुबईत आहे.

हेही वाचा – FIFA World Cup 2022: लिओनेल मेस्सीसाठी वेडे झाले संपूर्ण जग; २८ वर्षांनंतर स्टेडियममध्ये पोहोचले सर्वाधिक प्रेक्षक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला एमएस धोनी आयपीएलच्या पुढील हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून खेळणार आहे. धोनी २०१९ नंतर प्रथमच सीएसकेच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे, ज्याची त्याने पुष्टी देखील केली आहे. ४१ वर्षीय धोनीची खेळाडू म्हणून पुढील आयपीएल शेवटची आयपीएल असू शकते.