India vs Pakistan match in Cricket World Cup 2023: आशिया चषक २०२३ नंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा विश्वचषक २०२३ मध्ये आमनेसामने आहेत. दोन्ही देशांमधला हा हाय व्होल्टेज सामना आज म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी दोन वाजल्यापासून खेळवला जाईल. आशिया चषकातील पराभवाचे दु:ख विसरून पाकिस्तानचा संघ विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तानवर विजय मिळवून या स्पर्धेत प्रगती करण्याचेही भारताचे लक्ष्य असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वचषकात दोन्ही संघ सात वेळा आमनेसामने आले आहेत, पण पाकिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नाही. या मोठ्या सामन्यासाठी दोन्ही संघांसोबतच चाहतेही सज्ज झाले आहेत. सामन्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये लाखो चाहते नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर उभे असलेले दिसत आहेत.

एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानचा विक्रम –

भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतीय भूमीवर एकूण ३० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाने १९ सामने जिंकले आहेत, तर भारताने ११ सामने जिंकले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्धचा विक्रम भारतीय भूमीवर अधिक चांगला दिसतो.

हेही वाचा – IND vs PAK, World Cup 2023: भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही संघांचे चाहतेही सज्ज; तयारी करतानाचा VIDEO व्हायरल

एकदिवसीय विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले, तर आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतीय भूमीवर दोन सामने खेळले गेले आहेत, ज्यात टीम इंडियाने प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. १९९६ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय भूमीवर खेळला गेला होता, ज्यामध्ये पाकिस्तान संघाचा पराभव झाला होता. या सामन्यात भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन होता. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ येथे दुसऱ्यांदा आमनेसामने आले होते. त्यावेळी भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला होता. एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतीय भूमीवर सामना रंगण्याची ही तिसरी वेळ असेल.