MS Dhoni driving a vintage Mini Cooper on the streets of Ranchi: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद मिळवून देणारा महेंद्रसिंग धोनी सध्या त्याच्या शहर रांचीमध्ये आहे. आधी धोनीने आपल्या मित्रांसोबत एक सुंदर फोटो शेअर केला होता, जो व्हायरल झाला होता. आता त्याचा रांचीच्या रस्त्यावर विंटेज मिनी कूपर चालवतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

धोनीला बाइक आणि कारची खूप आवड आहे, हे जगाला माहीत आहे. त्याच्याकडे एकापेक्षा एक अनोख्या बाईक आणि कार आहेत. त्याचे कार कलेक्शन खूपच शानदार आहे. रांचीमध्ये तो त्याच्या आवडत्या विंटेज मिनी कूपरला गाडी चालवताना दिसला. याआधी त्याचा बालपणीच्या मित्रांसोबतचा आणि भावासोबतचा फोटो व्हायरल होत होता.

Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या
Lakhat Ek Aamcha Dada
Video : महेश जाधवचा अभिनेत्रीबरोबर जबरदस्त डान्स; जुई तनपुरे व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा मावळा…”
Purva Kaushik
Video : “शिवा आज खऱ्या अर्थानं जिंकली…”, ‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणाली…
Bigg Boss Marathi Dhananjay Powar & ankita Walawalkar
Video : “जेव्हा आपली बहीण खरेदी करते…”, धनंजय पोवारचा मजेशीर व्हिडीओ चर्चेत! कमेंट्समध्ये अंकिताने केली पोलखोल

धोनी विंटेज मिनी कूपर गाडी चालवताना दिसला –

हा व्हिडीओ यूट्यूबवर सूरजखत्रीव्लॉग्सने अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी रांचीच्या रस्त्यावर लाल रंगाचा विंटेज मिनी कूपर गाडी चालवताना दिसत आहे. गेटच्या आत जाताना तो चाहत्यांना हात करताना दिसत आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

माहीचे कार कलेक्शन –

M

एमएस धोनीची गणना भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. त्याला बाईक आणि कारचीही खूप आवड आहे. त्याच्या गॅरेजमध्ये मर्सिडीज-बेंज GLE 250d, विंटेज रोल्स रॉयस सिल्वर रेथ २, १९७० च्या दशकातील फोर्ड मस्टॅँग ४२९ फास्टबॅक, जीप ग्रँड चेरोकी SRT, १९७० पोंटिएक फायरबर्ड ट्रांस एम, हमर H2, निसान जोंगा AQ7n यांचा समावेश आहे. त्याच्याकडे डझनहून अधिक महागड्या बाईक्सही आहेत.

हेही वाचा – ODI World Cup 2023: उद्यापासून विश्वचषक स्पर्धेच्या क्वालिफायर सामन्यांना सुरूवात, १० संघांमध्ये रंगणार ३४ सामने

नरेंद्र सिंग धोनीपेक्षा १० वर्षांनी मोठा –

धोनीच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये फक्त त्याच्या बहिणीचे पात्र दाखवण्यात आले होते. सोशल मीडियावर धोनी आणि त्याच्या भावाचा एकत्र फोटो कधीच दिसला नाही. त्यामुळेच धोनीला नरेंद्र सिंह धोनी नावाचा मोठा भाऊही आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. नरेंद्र हा अनुभवी क्रिकेटपटूपेक्षा १० वर्षांनी मोठा आहे. धोनीचा बायोपिक समोर आला, तेव्हा अनेकांनी सांगितले की, नरेंद्र सिंगला मुद्दाम या चित्रपटात दाखवण्यात आले नाही. एमएस धोनी आणि नरेंद्र यांच्या नात्यात तणाव असल्याच्या बातम्या नेहमीच येत होत्या.

Story img Loader