भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा नेहमी त्याच्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत असतो. धोनीचे चाहते त्याला मैदानात पाहण्यासाठी आसुसलेले आहेत. आता एमएस धोनी त्याच्या आयपीएल (IPL 2023) फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळताना दिसणार आहे. या अगोदर एमएस धोनीचा एक व्हिडिओ संध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन्ही आपल्या चाहत्याला चक्क पाठीवर ऑटोग्राफ देताना दिसत आहे.
धोनीचे जगभरात चाहते आहेत. अलीकडेच, फिफा विश्वचषक सामन्यादरम्यान, कतारमधील फुटबॉल स्टेडियममध्ये धोनीचे एक पोस्टर दाखवण्यात आले होते. त्यानंतर आता धोनी रस्त्याच्या कडेला त्याच्या एका चाहत्याला पाठीवर ऑटोग्राफ देताना दिसला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
एमएस धोनीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक चाहते म्हणत आहेत की, माझा नंबर कधी येईल जेव्हा मी धोनीचा ऑटोग्राफ घेईन. त्याचबरोबर धोनीकडून ऑटोग्राफ घेणाऱ्या चाहत्याला इतर चाहत्यांनी लकी म्हटले आहे. एमएस धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, धोनी रस्त्याच्या कडेला असलेल्या त्याच्या एका चाहत्याच्या टी-शर्टवर ऑटोग्राफ देत आहे.
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने टीम इंडियाला दोनदा वर्ल्ड चॅम्पियन बनवले आहे. अनेक सामन्यांमध्ये धोनीने भारतीय संघाला एकहाती विजय मिळवून दिला आहे. तर धोनी संघासाठी फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडत असे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक चाहत्यांची मनं दुखावली होती. धोनी जगातील सर्वात मोठ्या लीग आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. मात्र आगामी हंगामानंतर धोनी आयपीएलमधून निवृत्तीही घेऊ शकतो.