Mohammad Rizwan cleaning a shrine in Makkah has gone viral: पाकिस्तान क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान सध्या चर्चेचा विषय आहे. क्रिकेटपासून दूर असलेल्या मोहम्मद रिझवानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो असे काम करत आहे, ज्याला पाहून लोक त्याचे जोरदार कौतुक करत आहेत. याआधीही रिझवानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो अमेरिकेतील बोस्टन शहरात रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून नमाज पठण करताना दिसत होता.
मोहम्मद रिजवान सध्या मक्केत आहे. तो मक्केत साफसफाई करताना दिसत आहे. ८ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये रिजवान हातात वायपर घेऊन मक्कामधील मशिदीच्या आत साफसफाई करताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला निळ्या कपड्यात अनेक लोक उभे आहेत जे तिथले कर्मचारी आहेत. याआधी तो बोस्टनला मीडिया आणि स्पोर्ट्स या विषयावरील चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याच्यासोबत संघाचा कर्णधार बाबर आझमही उपस्थित होता.
मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानच्या प्रतिभावान खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आपल्या शानदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानला अनेक सामन्यात संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. पाकिस्तानचे अनेक खेळाडू सध्या घरी विश्रांती घेत आहेत, तर अनेक टी-२० लीगमध्ये खेळत आहेत.
हेही वाचा – IND vs WI: ‘बाबा खूप आनंदी असतील’, कसोटी आणि वनडे संघात निवड झाल्यानंतर मुकेश कुमार वडिलांच्या आठवणीने भावूक
मोहम्मद रिझवानची क्रिकेट कारकीर्द –
३१ वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज मोहम्मद रिझवानने पाकिस्तानसाठी आतापर्यंत २७ कसोटी, ५७ एकदिवसीय आणि ८५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत दोन शतके आणि ७ अर्धशतकांच्या मदतीने १३७३ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात दोन शतके आणि नऊ अर्धशतकांच्या मदतीने १४०८ धावा केल्या आहेत. रिझवानची टी-२० कारकीर्दही उत्कृष्ट राहिली आहे. त्याने एक शतक आणि २५ अर्धशतकांच्या मदतीने २७९७ धावा केल्या आहेत.