A video of Suryakumar Yadav getting angry with Arshdeep Singh : नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवला मालिका बरोबरीत सोडवण्यात यशस्वी ठरला. त्याने आपल्या कर्णधारपदासह फलंदाजीनेही चाहत्यांची मने जिंकली. मैदानावर सूर्या अतिशय मस्त शैलीत कर्णधार करताना दिसला, पण मैदानाबाहेर सूर्यकुमार यादवचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. वास्तविक सूर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अर्शदीप सिंगवर संतापल्याचा दिसत आहे.
बसमध्ये अर्शदीपवर संतापला सूर्या –
सोशल मीडिया व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव टीम बसमध्ये अर्शदीपवर रागावताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. सूर्याचा हा संतापल्याचा व्हिडीओ एका चाहत्याने बाहेरून शूट करून इंटरनेटवर अपलोड केला. हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला. सूर्या अर्शदीपला कशावरून तरी रागवत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, सूर्याला कशामुळे राग आला हे स्पष्ट झालेले नाही.
तिसर्या टी-२०मध्ये अर्शदीप सिंग ठरला होता महागडा –
सूर्या अर्शदीपवर का संतापला होता, याचे खरे कारण अद्याप समोर आले नसले, तरी तिसर्या टी-२०मध्ये अर्शदीप सिंग चांगलाच महागात ठरला. याच गोष्टीवरून सूर्याने अर्शदीपवर राग व्यक्त केला असण्याची शक्यता आहे, कारण हा व्हिडिओ तिसर्या टी-२० नंतरचा आहे, जेव्हा टीम इंडिया बसमधून हॉटेलकडे परतत होती. तिसऱ्या टी-२० मध्ये, अर्शदीप सिंगने १५.५० च्या इकॉनॉमीने दोन षठकांत ३१ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. सूर्याने पुन्हा त्याला तिसरे षटक टाकण्यासाठी दिले नाही.
हेही वाचा – IPL 2024 : लिलावापूर्वी भारतीय गोलंदाजाच्या शैलीवर प्रश्न उपस्थित, बीसीसीआयने संशयास्पद यादीत केला समावेश
सूर्याने शेवटच्या टी-२० मध्ये झळकावले शतक –
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवची शानदार फॉर्ममध्ये दिसला होता. शेवटच्या टी-२० मध्ये त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. या मालिकेत सूर्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. सूर्याने दोन सामन्यात ७८ च्या सरासरीने १५६ धावा केल्या, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून एक शतक आणि एक अर्धशतक झळकले. सूर्याने तिसऱ्या टी-२०मध्ये ५५ चेंडूत झटपट शतक झळकावले होते.