Virat Kohli and Quick Style Group: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या खेळाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. तसेच त्याचे सोशल मीडियावर फॉलोअर्स देखील मोठ्या प्रमाणात आहेत. तो नेहमी वेगवेगळे उपक्रम करताना दिसतात. अशात आता विराट कोहली डान्स करत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत क्विक स्टाइल या प्रसिद्ध डान्स ग्रुपसोबत जुगलबंदी (विराट कोहली डान्स) करताना दिसला. त्याचा व्हिडिओ क्विक स्टाइल ग्रुपने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

क्विक स्टाईल ग्रुप हा एक डान्स ग्रुप आहे. जो नॉर्वेजियन हिप-हॉप डान्स ग्रुप आहे. तर हा गट सध्या भारतात आला आहे. अनेक कॉन्सर्ट केल्यानंतर हा ग्रुप जाऊन विराट कोहलीला भेटला. विराटने देखील या ग्रुपला भेटल्यानंतरचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

यादरम्यान तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल की ग्रुपमधील एका सदस्याकडे बॅट आहे. त्यानंतर कोहली येतो आणि त्याच्याकडून बॅट मागतो. मग ग्रुपचे सर्व सदस्य सोबत येतात आणि विराट कोहलीसोबत मस्त डान्स करायला लागतात. तसेच हा व्हिडिओ पोस्ट करताना क्विक स्टाइल ग्रुपने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा विराट क्विक स्टाइलला भेटला.”

विराट कोहली १७ मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग असेल. जिथे तो या मालिकेत अनेक रेकॉर्ड बनवताना आणि मोडताना दिसणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीत कोहलीने १८६ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीने त्याचा कसोटी क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ संपवला. कारण त्याने जवळपास गेल्या तीन वर्षांपासून कसोटीत शतक झळकावले नव्हते.

वनडे मालिकेसाठी संघ –

ऑस्ट्रेलिया संघ: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार) शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झाम्पा

हेही वाचा – Suryakumar Yadav: स्कायच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! जिओ सिनेमाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून सूर्यकुमार यादवची वर्णी

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.

Story img Loader