World Cup 2023, India vs Australia Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील पहिल्या सामन्यातभारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १९९ धावा केल्या होत्या . प्रत्युत्तरात टीम इंडियान विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या शानदार अर्धशतकच्या जोरावर ६ विकेट्सने विजय मिळवला. भारताने ४१.२ षटकांत ४ गडी गमावून २०१ धावा करता विजयावर शिक्कामोर्तब केला. आता या सामन्यातील विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विराट कोहली ११६ चेंडूत ८५ धावा करून बाद झाला. जोश हेझलवूडने त्याला मार्नस लॅबुशेनकरवी झेलबाद केले. कोहलीने आपल्या डावात सहा चौकार लगावले आणि राहुलसोबत १६५ धावांची भागीदारी केली. मात्र, तो सामना पूर्ण करू शकला नाही आणि त्याचे शतकही हुकले, पण टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन तो बाद झाला.ज्यामुळे विराट कोहलीही निराश दिसून आला. त्याने ड्रेसिंगमध्ये गेल्यावर आपली निराशा व्यक्त करताना कपाळावर दोनदा हात मारुन घेतला. तसेच तो आपली निराशा कॅमेरामॅनपासून लपवण्यासाठी खाली मान घालतानाही दिसला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Virat Kohli Shakes Hand with Ball Boy in IND vs ENG Cuttack ODI Boy Left Awestruck Video Viral
IND vs ENG: विराटच्या कृतीने बॉल बॉय झाला अवाक्, सीमारेषेजवळ कोहलीने असं काही केलं की… VIDEO होतोय व्हायरल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
विराटच्या अनुपलब्धतेमुळे संधी!श्रेयस अय्यरची प्रतिक्रिया; पहिल्या सामन्यातील निर्णायक खेळीबाबत समाधानी
IND vs ENG Gautam Gambhir may be unhappy with Rohit Sharma duos intense chat triggers speculations after video viral
IND vs ENG : गौतम गंभीर रोहित शर्मावर नाराज? सामन्यानंतरचा VIDEO व्हायल झाल्यानंतर चर्चेला उधाण
Sunil Gavaskar slam KL Rahul gets out trying to help Shubman Gill get a century in IND vs ENG 1st ODI
IND vs ENG : “हा सांघिक खेळ आहे आणि तुम्हाला…”, गिलच्या शतकाच्या नादात बाद झालेल्या राहुलवर गावस्कर संतापले
Rohit Sharma Gives Update on Virat Kohli Knee Injury on Toss of IND vs ENG 1st ODI
IND vs ENG: विराट कोहली पहिल्या वनडेत का नाही? रोहित शर्माने दिले अपडेट
IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
Virat Kohli Clean Bowled on Ranji Trophy Return
Virat Kohli Ranji Trophy: विराट कोहलीच्या पदरी रणजीतही निराशा! स्टंप्सच्या कोलांटउड्या, पाहा VIDEO

भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत विश्वचषक स्पर्धेतील विजयी सुरुवात केली. या सामन्यात भारताच्या विजयाचे नायक लोकेश राहुल आणि विराट कोहली होते. मात्र, दोन्ही फलंदाजांचे शतक हुकले. राहुलने ९७ धावांची नाबाद खेळी तर कोहलीने ८५ धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय फक्त हार्दिक पांड्याला खाते उघडता आले. त्याने ११ धावा केल्या.

हेही वाचा – IND vs AUS, World Cup 2023: पहिल्याच सामन्यात किंग कोहलीचा ‘विराट’ धमाका, मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम

ऑस्ट्रेलियातकडून जोश हेझलवूडने ३ आणि मिचेल स्टार्कने १ विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४६ धावा केल्या. वॉर्नरनेही ४१ धावांची खेळी खेळली. अखेरीस स्टार्कने २८ धावांचे योगदान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Story img Loader