Virat Kohli Playing With Dog Video Viral: आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुपर-4 फेरीतील तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान संघात खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी १० सप्टेंबरला कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यापूर्वी भारतीय संघाने कसून सराव केला. सराव सत्रा दरम्यानचा विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टीम इंडियाच्या प्रॅक्टिसदरम्यान अचानक एक छोटा कुत्रा मैदानात आला, जो पाहून कोहली स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याच्याशी खेळू लागला. कोहली आधी कुत्र्याला स्वतःकडे बोलावतो आणि नंतर त्याच्याशी खेळण्यात मग्न झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी कुत्राही खेळाडूंच्या फुटबॉलच्या मागे धावताना दिसला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
विराट कोहलीचे कुत्र्यांवरचे प्रेम कुणापासून लपलेले नाही. त्याचे सोशल मीडिया अकाऊंट कुत्र्यांच्या फोटो आणि व्हिडीओंनी भरलेले आहे. अलीकडेच, त्याने त्याच्या भूतानच्या सहलीतील एक हृदयस्पर्शी थ्रोबॅक फो शेअर केले होते, जिथे तो मठाबाहेर एका गोंडस पिल्लाला मिठी मारताना आणि पोज देताना दिसला होता.
विराट कोहलीकडे ब्रुनो नावाचा कुत्रा देखील होता, जो २०२० मध्ये मरण पावला. विराटकडे हा कुत्रा ११ वर्षांपासून होता आणि जेव्हा त्याचा मृत्यू झाला. तेव्हा त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून आपल्या ब्रुनोच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले होते.
आशिया चषकसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.