Virat Kohli practicing reverse sweep on R Ashwin’s bowling: टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १२ जुलैपासून डॉमिनिका येथे होणार आहे. मात्र, यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू सराव सत्रात प्रचंड घाम गाळत आहेत. त्याचवेळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली नेट सरावा दरम्यान रवी अश्विनच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारताना दिसत आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल –
याशिवाय विराट कोहली टीम इंडियाचा युवा खेळाडू यशस्वी जैस्वालला नेट प्रॅक्टिस दरम्यान टिप्स देताना दिसत आहे. मात्र, दोन्ही व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडत आहेत. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. रवी अश्विन व्यतिरिक्त, विराट कोहलीने नेट सत्रादरम्यान रवींद्र जडेजा आणि जयदेव उनाडकट यांच्याविरुद्ध फलंदाजीचा सराव केला. या गोलंदाजांविरुद्ध नेट सराव करताना भारताचा माजी कर्णधार विराट कोहली उत्कृष्ट लयीत दिसला.
वेस्ट इंडिजविरुद्धची विराट कोहलीची कामगिरी –
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीची कामगिरी त्याच्या दर्जानुसार फारशी चांगली राहिली नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या १४ कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीने ४३.२६ च्या सरासरीने ८२२ धावा केल्या. कोणत्याही कसोटी खेळणाऱ्या संघाविरुद्ध विराट कोहलीचा हा दुसरा सर्वात वाईट आकडेवारी आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या तयारीसाठी भारतीय सराव सत्रात व्यस्त आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भारत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक –
भारतीय संघ दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी२० सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करेल. कर्णधार रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने करणार असून त्यातील पहिला सामना १२ जुलैपासून खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना २० जुलैपासून सुरू होणार आहे. त्याचवेळी, २७ जुलैपासून एकदिवसीय मालिका सुरू होईल आणि शेवटचा सामना १ ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. त्यानंतर लगेचच टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेला ३ ऑगस्टपासून सुरूवात होणार असून शेवटचा सामना १३ ऑगस्टला असणार आहे.