Aakash Chopra reacts on ACB’s decision to ban : आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघांना मोठा धक्का बसला आहे. या संघातील तीन खेळाडूंना आयपीएलच्या १७ व्या हंगामात खेळणे कठीण आहे. या यादीत मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी आणि नवीन उल हकसारखे खेळाडू आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या तिन्ही खेळाडूंवर फ्रँचायझी क्रिकेट खेळण्यास २ वर्षांची बंदी घातली आहे. यावर आता माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचे तीन खेळाडू नवीन उल हक, फजलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान यांच्यावर पुढील दोन वर्षांसाठी फ्रँचायझी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे. बोर्ड या तिन्ही खेळाडूंना पुढील दोन वर्षे कोणत्याही लीगमध्ये सहभागी होऊ देणार नाही. या खेळाडूंनी केंद्रीय करारातून माघार घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर बोर्डाने हे पाऊल उचलले आहे. बोर्डाच्या या निर्णयाला आकाश चोप्राने विरोध केला आहे.

जिओ सिनेमावर खेळाडूंवर बंदी घालण्याबाबत आपले मत मांडताना आकाश चोप्रा म्हणाला, “फ्रँचायझी क्रिकेटसाठी खेळाडूंवर बंदी घालण्याचा बोर्डाचा निर्णय चुकीचा आहे. बोर्डाने हे समजून घेतले पाहिजे की खेळाडू फ्रँचायझी क्रिकेट खेळतात जेणेकरून त्यांना त्यांचे आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता येईल. जे अफगाण बोर्डाकडून मिळालेल्या पैशाने शक्य नाही. त्याचबरोबर या खेळाडूंची ओळख अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डामुळे नसून फ्रँचायझी क्रिकेटमुळे आहे, हेही बोर्डाला समजून घ्यावे लागेल.”

हेही वाचा – IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेपूर्वी मोठी घोषणा, ‘या’ सामन्याची तिकिटे मिळणार फक्त ‘इतक्या’ रुपयात

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “अफगाण क्रिकेटच्या विकासात लीग क्रिकेटचे मोठे योगदान आहे. त्यामुळे खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यांच्यावर बंदी घातल्याने आयपीएलच्या तीन संघांची डोकेदुखी वाढली आहे. शेवटच्या क्षणी पर्याय शोधणे त्यांच्यासाठी थोडे कठीण जाऊ शकते. तथापि, त्यात अजूनही काही ट्विस्ट येवू शकतात.” फजलहक फारुकी सनरायझर्स हैदराबादशी संबंधित आहेत. नवीन उल हक लखनौ सुपरजायंट्सशी संबंधित आहे, तर मुजीब उर रहमान केकेआरशी संबंधित आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aakash chopra reacts on acbs decision to ban mujeeb ur rehman fazalhaq farooqui naveen ul haq from franchise cricket vbm